राजस्थान राज्याचे महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले साईबाबांचे मनोभावे दर्शन!
शिर्डी (प्रतिनिधी)
राजस्थान राज्याचे राज्यपाल महामहिम श्री. हरीभाऊ बागडे यांनी आज शनिवारी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.
राज्यपाल महोदय श्री. हरीभाऊ बागडे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानचे वतीने श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी शाल व श्री साई मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.
श्री.हरिभाऊ बागडे यांच्या रूपाने महाराष्ट्रीयन व्यक्तीला राजस्थान सारख्या राणा प्रताप यांच्या भूमीमध्ये राज्यपाल होण्याची चौथ्यांदा संधी मिळाली आहे. याआधी 1980 च्या दशकात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि त्यानंतर 2004 मध्ये प्रतिभाताई पाटील यांना ही संधी मिळाली होती. त्यानंतर प्रभा राव राजस्थानच्या राज्यपाल होत्या. आता राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे आहेत. विशेष म्हणजे राजस्थानचे राज्यपाल झालेले हे चौघेही साईभक्त आहेत.व त्यांनी शिर्डीला येऊन साई दर्शन घेतलेले आहे. आज महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे हे शिर्डीत आले. त्यांनी साई दर्शन घेतले. त्यांच्याबरोबर त्यांचे काही अधिकारी व कार्यकर्तेही होते. तसेच राज्यपाल असल्यामुळे त्यांना सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्तही होता.