राहाता तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभागीय आढावा बैठक नुकतीच राहाता येथे उत्साहात संपन्न! काँग्रेस अनुसूचित जाती विभाग तालुका अध्यक्ष म्हणून साहिल म्हस्के यांची निवड!!
शिर्डी ( प्रतिनिधी)
राहाता तालुका कॉंग्रेसअनुसूचित.जाती.विभागीय आढावा बैठक नुकतीच राहाता येथे विविध विषयावर चर्चा करत उत्साहात पार पडली.
या वेळी आगामी विधानसभा निवडणुका तसेच नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती संदर्भात,व कार्यकर्तेच्या समस्या समजुन घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचा आणि तालुका नवीन कार्यकारिणी करण्याचा एकजूटने यावेळी निर्णय घेण्यात आला.
अहमदनगर कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बंटी भाऊ यादव यांनी नवीन जुन्या कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्या संदर्भात सूचना दिल्या. कार्याध्यक्ष गावित्रे साहेब यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बंटी भाऊ यादव हे होते. यावेळी राहता तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष म्हणून सावळीविहीर येथील तरुण व सामाजिक कार्यकर्ते साहिल म्हस्के यांची निवड करण्यात आली. आपल्यावर पक्षाने टाकलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे संभाळू, व पक्ष वाढवण्यासाठी विविध विकास योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी मोठे प्रयत्न करू ,असे यावेळी साहिल म्हस्के यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष डॉ गावित्रे साहेब ,थोरे साहेब, कोपरगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ पगारे,राहता शहर अध्यक्ष अमोल आरणे,राज जेजुरकर, दिपक खंडीझोड,नितीन वाकले ,मनोज आरणे,आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार साहिल म्हस्के यांनी मानले.