शिर्डीत साई संस्थांनच्या वतीने गोकुळाष्टमी व गोपाळकाला उत्सव विविध कार्यक्रमानीं होणार साजरा!
शिर्डी ( राजकुमार गडकरी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानविश्वस्तव्यवस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रावण कृ.||८ रोजी “गोकुळ अष्टमी” (श्री कृष्ण जयंती) व श्रावण कृ.||९ रोजी “गोपाळकाला” हा स्थानिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
सदर उत्सावाच्या निमित्ताने सोमवार, दि.२६ ऑगस्ट २०२४ रोजी रात्रौ १० ते १२ यावेळेत श्रींचे समाधी मंदिरातील स्टेजवर श्रीकृष्ण जन्माचे किर्तन व श्री कृष्ण जन्म सोहळा तर मंगळवार, दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत संस्थांनच्या गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाचे स्टेजवर गोपालकाला किर्तनाचे आयोजन करणेत आले आहे. तसेच दहीहंडीचा कार्यक्रम हा साईसमाधी मंदिरात घेण्यात येईल. या कार्यक्रमाचा सर्व साईभक्त व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा ,असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.