श्री क्षेत्र शहा पंचाळे येथील गंगागिरी महाराज सप्ताहास मा.सभापती डॉ.वंदना मुरकुटे यांची भेट…
श्रीरामपूर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याचीअध्यात्मिकधार्मिकतेची अस्मिता टिकवून ठेवणारा यावर्षीचापंचाळे,सिन्नर येथील सद्गुगुरु
योगीराज गंगागिरी महाराज 177 वाअखंड हरिनाम सप्ताहास श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती व संत साहित्यिका डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनीभेट दिली.
डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनीसप्ताहाची यशस्वी परंपरा सुरू ठेवणारेसरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांचे संत पूजनकेले.
याप्रसंगी राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पूर्वी सरला बेट वसप्ताहाचा इतिहास मौखिक स्वरूपात बोललाजात होता, परंतु डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी सर्वमाहिती संकलित करून सदगुरू योगीराजगंगागिरी ते सदगुरू नारायणगिरी महाराज हेप्रथम सरला बेटावरील सप्ताहाची महतीसांगणारे सुंदर पुस्तक 2015 साली लिहिले वसुरुवातीलाच त्याच्या 10,000 प्रती विकल्या
गेल्या. त्यानंतर 2017 साली दुसऱ्या आवृत्तीच्या 5000 प्रति विकल्या हे पुस्तक लिहिण्याचे प्रथम भाग्य मलामिळाले याबद्दल मनस्वी समाधान असल्याचेडॉ. वंदनाताई मुरकुटे म्हणाल्या.
लेने को हरिनाम व देने को अन्नदान … हीसप्ताहाची अदभूत संकल्पना असून यासप्ताहाची कीर्ती व महती दिवसेंदिवस वाढतअसल्याचे त्या म्हणाल्या. प्रत्येक भक्तगण येथूनऊर्जा घेऊन जातो. यावेळी मधुकर महाराज व सप्ताह कमिटीचे सदस्य यांच्या समवेत सप्ताहाच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली .सप्ताहातील भाकरी -आमटीमोठे आकर्षण असते. सप्ताहाला ह.भ.प रामगिरीमहाराजांनी मोठे स्वरूप दिलले आहे.त्याचप्रमाणे सरला बेटा चा परिसर भाविक भक्तासाठी समृद्ध केला . वारकरी समाजाचा भक्ती मेळावा आहे असे डॉ.मुरकुटे म्हणाल्या.