महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेची श्रीरामपूर तालुका कार्यकारणी जाहीर.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी प्रा. ज्ञानेश गवले*
(उपाध्यक्षपदी लांडगे व बनकर; सचिव लोखंडे, सहसचिव देसाई)
श्रीरामपूर (सत्तेचा महासंग्राम न्युज)
राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी प्रा. ज्ञानेश गवले , उपाध्यक्षपदी चंद्रकांत लांडगे व साईनाथ बनकर,सचिवपदी दिलीप लोखंडे, सहसचिवपदी देविदास देसाई आणि खजिनदारपदी अमोल कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, अशी माहिती परिषदेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली.
परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार अशोक गाडेकर, बाळासाहेब भांड यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेच्या श्रीरामपूर तालुका कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीत सदस्य म्हणुन सर्वश्री भाऊसाहेब काळे, बी. आर. चेडे, बापु नवले, भरत थोरात, दिपक क्षत्रिय, मयुर गव्हाणे आणि सचिन उघडे यांचा समावेश आहे. सल्लागारपदी सर्वश्री अशोक गाडेकर, बाळासाहेब भांड, प्रकाश कुलथे,रविंद्र भागवत, महेश माळवे, विकास अंत्रे, शिवाजी पवार, बाळासाहेब आगे,करण नवले, राजेंद्र बोरसे, नवनाथ कुताळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीप्रसंगी तालुक्यातील सर्वश्री अशोक अभंग,लालमहंमद जहागीरदार, महेश रक्ताटे,अमोल बोर्डे, दिलीप तांबे, विकास बोर्डे, प्रविण दरंदले,व्ही.डी.देवळालकर, दिलीप दायमा, अतिश देसर्डा, र्विश्वनाथ जाधव,आदी उपस्थित होते.
नूतन पदाधिकारी कार्यकारीणीचे मराठी व पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे, प्रदेश प्रतिनिधी सुनिल नवले, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक गुरुप्रसाद देशपांडे, सह निमंत्रक राजेंद्र उंडे,डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.