मथुराबाई जपे यांचे निधन.
शिर्डी (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील गं.भा.मथुराबाई सोपानराव जपे पा.यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम सोपानराव जपे व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे ऑपरेटर बाबासाहेब सोपानराव जपे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनामुळे सावळीविहीर व परिसरात मोठे दुःख व्यक्त होत आहे. त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी नऊ वाजता सावळीविहीर बुद्रुक भवानी माता मंदिराजवळील पाटावर होणार आहे. ग.भा मथुराबाई सोपानराव जपे यांचे निधन झाल्यानंतर अनेकांनी सावळीविहीर बु. येथे जपे यांच्या शोकाकुल परिवाराला भेटी दिल्या. माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील , श्रीराम दूध संघाचे रावसाहेब म्हस्के पाटील, सौ प्रतिभाताई घोगरे पाटील, अरुण येवले ,विजय रोहम, आव्हाड, त्याचप्रमाणे राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व तालुक्यातील पदाधिकारी येथे भेट देऊन शांताराम जपे व बाबासाहेब जपे व परिवाराचे सांत्वन केले. ग.भा. मथुराबाई सोपानराव जपे यांचे माहेर हे विळद तालुका नगर येथील, त्या आडसुरे कुटुंबातील, पूर्वीपासूनच हे आडसुरे कुटुंब शेतकरी व धार्मिक वृत्तीचे होते. त्यामुळे येथे सासरीही त्यांनी शेतीत खूप कष्ट केले. त्या धार्मिक होत्या. त्यांचे मृत्यू समयी वय 84 वर्ष होते. श्रावणी शनिवारी मंदिरातून दर्शन करून घरी येत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यामध्ये त्यांचे निधन झाले. त्या भजन, हरिपाठ नेहमी करायच्या, भारतातील अनेक धार्मिक तीर्थस्थळांना त्यांनी आपल्या तरुण वयात भेटी देऊन देवदर्शन केले होते. अशा धार्मिक वृत्तीच्या व सर्वांना आपुलकीने, स्नेहभवाने वागवणाऱ्या या मातोश्रींचे अल्पशा अशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले ,दोन मुली तसेच सुना नातवंडे व मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने जपे परिवार, आप्तगण, सावळीविहीर परिसरातही दुःख व्यक्त होत असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांचा दशक्रिया विधी सोमवार 19 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी नऊ वाजता सावळीविहीर बुद्रुक येथील भवानी देवी मंदिरात जवळील पाटावर होणार आहे. तसेच येथे ह भ प अरुण महाराज रोहोम, कोकमठाण यांचे प्रवचन होणार आहे.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो!!