प्रवरा कन्या मंदिरच्या मुलींनी वारकरी दिंडीत पावली खेळत सहभागी होऊन घेतला सुखद अनुभव ज्ञानोबा माऊली तुकाराम भजनावर धरला पायाचा ठेका…
लोणी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या
प्रवरा कन्या विदया मंदीर लोणीच्या विद्यार्थ्यींनीसह शिक्षक , शिक्षिकांनी पंढरपूरची श्री विठ्ठलाची यात्रा दोन दिवसांवर आलेली असताना आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल पांडूरंग परमात्म्याच्या यात्रेनिमित्त आज विद्यालयात मुलींनी व शिक्षकांनी छानसी पालखी सजवून मिरवणुकीने श्री विठ्ठल रुक्मिणी व महाराष्ट्रातील आजवर होऊन गेलेल्या संतांचे व पांडुरंगाचे चिंतन व मनन करून संपूर्ण समाजाला हिंदू धर्माचे महत्व , हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हिंदू धर्माची पताका खांद्यावर घेत समाज प्रबोधनाचे कार्य केले.
प्रवरेच्या शैक्षणिक संकुलामध्ये जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुष्मिता विखे पाटील, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे यांच्या माध्यमातून नेहमीच भारतीय संस्कृतीचे जतन करणारे उपक्रम हे सुरू असतात याच माध्यमातून भारतीय संस्कृतीची जडणघडण आणि ओळख या निमित्ताने निर्देश विद्यार्थ्यांना होत असते.
संतांच्या वेषात आपला पेहराव करून पालखी सोबत ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष करीत संपूर्ण परिसरात विठ्ठलमय भक्तीरसाचे वातावरण तयार केले होते यावेळी सर्व विद्यार्थ्यीनींनी महाराष्ट्र राज्याचा व वारकरी संप्रदायाचा पोशाख परिधान करून सर्वांचे मन आकर्षून घेतले. दिंडीमध्ये सर्वात पुढे अश्वारूढ मुलगी तिच्या हातात मोठा भगवा झेंडा , पालखी व त्यामध्ये पांडूरंग व रुख्मिणी मातेच्या फोटो प्रतिमा, त्यानंतर आरास केलेल्या विद्यार्थ्यीनी , भजन व गायन करणाऱ्या मुलींचा संच, अशी सर्व दिंडी आणि वारकरी संप्रदायाची पताका व ज्ञानोबा तुकाराम असा नामघोष करीत वाद्याच्या तालावर पाऊली खेळत विद्यार्थ्यीनीं सहभागी झाल्या. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही वारकरी दिंडी काढण्यात आली त्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील लहानमोठया सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन स्वर्ग सुखाचा अनुभव घेतला. प्रथमतः पालखीचे पूजन विद्यालयाच्या प्राचार्या सौ भारती कुमकर यांनी केले. यावेळी प्राथमिक विभाग प्रमुख सौ सीमा बढे, क्रीडा शिक्षिका सौ विद्या घोरपडे, सौ कल्पना कडू यांनी विद्यार्थीनीची शिस्त कायम ठेवत ,भजनाची तालीम व दिंडीतील वारकरी पावली बसवण्यासाठी ह.भ.प. प्रल्हाद देशमुख सर,ह.भ.प. अनिल लोखंडे या सर्वानी मनस्वी प्रयत्न केले. विद्यार्थीनी सोबतच शिक्षकांनी देखील विठूमाऊलीचा नामाघोष करीत भजनाच्या तालावर पाऊली खेळत आनंद घेतला, तर शिक्षक वृंदातून सुरेश गोडगे , कलाशिक्षक जितेंद्र बोरा, भिंगारे, योगेश दिघे, रवींद्र डगळे , नितीन शिरसाठ, अनिल बोंबले ,तुषार पगारे, प्रशांत अकोलकर,सूरज फणसे, दिनकर अनाप, सुनील माघाडे, सागर मोघे, सौ ज्योती बनसोडे,स्वाती निर्मळ, बेलकर , आहेर , करपे , सौ स्वाती अंत्रे , सौ अर्चना रोकडे, अंजुम शेख, पटेल आदींनी आरास व दिंडीचे भव्य नियोजन करून अतिशय मेहनतीने कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे सगळीकडे भक्तिमय वातावरण पाहावयास मिळाले.
कोट..
.यानिमित्ताने प्रवरा कन्या विद्या मंदिर च्या विद्यार्थिनींनी सादर केलेला रिंगण सोहळा हा अतिशय देखणा ठरला अश्व, टाळकरी, आणि वारकरी यांनी यामध्ये सहभाग घेतला.