ईश्वराची साधना करण्यासाठी सर्वात साधा सोपा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग— ह भ प माधव महाराज पैठणकर —————————- श्री साईसतचरित्र पारायण व हरिनाम सप्ताह सावळीविहीर बुद्रुक –किर्तन मालिका-पुष्प चौथे
शिर्डी( प्रतिनिधी)
ईश्वराची साधना करण्यासाठी ज्ञान, उपासना, भक्ती, योग, आदी मार्ग आहेत. पण यापैकी भक्तिमार्ग सोपा आहे. पण त्यासाठी पथ्य, ज्ञान ,प्रेम, भाव त्याग, वैराग्य आदी असायला हवं. असं हभप माधव महाराज पैठणकर यांनी आपल्या कीर्तनातून निरूपण करताना सांगितलं.
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे श्री साई सतचरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताहच्या कीर्तन मालिकेत चौथे पुष्प गुंफतांना ते आपल्या कीर्तनात निरूपण करताना बोलत होते.
ह भ प माधव महाराज पैठणकर पुढे म्हणाले की, साध्य आणि साधन काय आहे ,हे कळाले पाहिजे, भक्ती केल्यानंतर भक्ताला अलंकार प्राप्त होत असतात .पण ते समजायला पाहिजे. ते समजले नाही तर मीपणा,अहंपणा शहाणपणा निर्माण होतो. तो होऊ नये,त्यासाठी सद्गुरु महत्त्वाचे आहेत. असे सांगत संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, भक्तीच्या महापुरात अनेक दिसतात .पण पैलतिरी थोडेच पाहायला मिळतात. म्हणजे पूर्णत्वाला प्राप्त झालेले हे थोडेच असतात. जे पूर्णत्वाला गेले त्यांची काळजी करण्याची गरज नाही. पण जे महापुरात म्हणजे भक्तीच्या मार्गावर आरूढ झालेले आहेत. त्यांची काळजी संतांना आहे. त्यासाठी संत ,सद्गुरूंची गरज आहे. असे सांगत भगवंतांने हा देह दिला, ज्ञान दिलं, इंद्रिय दिले, वावरण्याकरता जीवनही दिलं, त्यांनी एवढं मोठं दान दिलं त्यासाठी आपणही त्यांना भजलं पाहिजे, जो मनापासून भजतो त्याला नक्कीच अनुभूती येते, म्हणूनच श्री साईंनी सुद्धा म्हटलं आहे ,जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव! म्हणून संकटात देवाला धाव म्हणायचं व नंतर विसरून जायचं हा खरा भाव नाही, संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ,ज्या भक्ताला जीवापेक्षा देव आवडतो, त्या भक्ताला प्राणापेक्षाही देव जवळ करतो. असं सांगत ईश्वर जळी स्थळी काष्टी सर्वत्र भरलेला आहेच. भिवरेच्या तीरी असणारे पंढरी हे माहेर असून विठ्ठल रुक्मिणी ही माय बाप आहे. असे संत म्हणतात असे सांगत सूर्य उगवल्यावर अंधकार दूर होतो,
दाही दिशा उजळतात . त्यासाठी वेळलागत नाही .दिवा पेटवला कि अंधकार दूर होतो . सूर्य उगवणे हे कर्म आहे व प्रकाश पडणं ही फलश्रुती आहे. सूर्याला उगवल्यानंतर सर्व सृष्टी प्रकाशमान करायला वेळ लागत नाही. तसेच अध्यात्मिक केलेल्या दिव्यात्मक कामाचे फळ प्राप्त करण्याकरता त्याला काळ, वेळ लागत नाही. साखर पाहण्यात नाही तर खाण्यात आनंद आहे तसेच भक्तीत जो खराभक्ती साधक आहे त्यास ज्ञान,व अनुभूती परमार्थाची होते. मात्र ज्याला ज्ञानाचा अहंकार होतो. त्याला साखरेप्रमाणे परमार्थ पाहण्यातच आनंद मिळतो. मात्र त्यास तो भेटत नाही. त्याच्याकडे असणारी मी, अहंकार ,शहाणपणाची उपाधी देवापर्यंत त्यास पोहोचू देत नाही. असे सांगत गाय व्याल्यानंतर जशी आपल्या वासराकडे पान्हा सोडताच जाते, तशी खऱ्या साधकाकडे ईश्वर स्वतः धावून येतात. असे संत सांगतात. त्यामुळे आपण परमार्थ करण्यासाठी मनोभावे भक्ती केली पाहिजे. असे त्यांनी यावेळीऔ अनेक दृष्टांत देत निरूपण करताना सांगितले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बाळासाहेब जपे , महेश जपे व इतरांकडून सत्कार करण्यात आला . यावेळी मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते. त्याचप्रमाणे शुक्रवारी पंगत देणारे गणेश आगलावे, शरद जपे,गणेश कापसे, दिनेश आरणे, किरण जपे , गोरक्ष लिपणे,आदींचा महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.