Breaking
ब्रेकिंग

पिसळलेल्या कुत्र्याचा टाकळीभान येथे घेतला अनेकांना चावा.

0 9 1 3 8 2

 

टाकळीभान( प्रतिनिधी )

टाकळीभान येथील महादेव मंदिर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा संचार असून चार-पाच जणांना त्याने चावा घेतला आहे.

त्यामुळे नागरिक व शालेय विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. महादेव मंदिर परिसरात या पिसाळलेल्या कुत्र्याचा संचार असून लक्ष्मीवाडी परिसर व गावामध्ये ते फिरत आहे. सध्या श्रावण महिना सुरू झाल्याने महादेव मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. तरी याबाबत शालेय विद्यार्थी व नागरिक, महादेव मंदिर येथे येणाऱ्या भाविकांनी सावधानता बाळगावी व या पिसाळलेल्या कुत्र्यापासून सावधान राहावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

2/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे