शारदा विद्या मंदिर राहाता येथे शिक्षक पालक व माता पालक संघाची स्थापना.
राहाता (सत्तेचा महासंग्राम न्युज)
आज सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी शारदा विद्या मंदिर राहता येथे शै. वर्ष 2024-25 या वर्षासाठीशिक्षक पालक संघ व माता पालक संघाची स्थापना करण्यात आली.
अध्यक्ष निवड विद्यालयातील उपशिक्षिका श्रीम.लकारे मॅडम यांनी केली. अनुमोदन श्री. जोशी सर यांनी दिले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारदा संकुलाचे मार्गदर्शक रमेशभाऊ शिंदे पा. होते. तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रमोद तोरणे सर ,प्रभारी पर्यवेक्षक श्री खंदारे सर,विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. विद्यालयातील उपशिक्षक श्री विवेक गाडेकर सरांनी प्रास्ताविकामध्ये शिक्षक पालक संघ व माता पालक संघ स्थापनेचा उद्देश सांगितला. यानंतर आलेल्या पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर शिक्षक पालक संघ व माता पालक संघ स्थापन करण्यात येऊन सदर संघाचे वाचन विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती सोनाली थोरात मॅडम यांनी केले. शिक्षक मनोगतामध्ये विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती आरती पवार मॅडम यांनी पालकांना आपल्या मुलांच्या शिस्तीकडे व अभ्यासाकडे लक्ष देण्याची विनंती केली. पालक प्रतिनिधी म्हणून सौ पूजा तारगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शारदा विद्यालयामध्ये देण्यात येणारे शिक्षण व राबवले जाणारे विविध उपक्रम याचा आमच्या मुलांना नक्कीच फायदा होतो असे मत त्यांनी मांडले.विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रमोद तोरणे सर यांनी पालकांची जबाबदारी सांगितली. आपला पाल्य घरी अभ्यास करतो की नाही याविषयी जागरूक राहण्यास सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेशभाऊ शिंदे पा. यांनी पालकांना आपल्या पाल्याच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले. तसेच पालकांनी आपल्या पाल्याचा विशेष लाड न करता त्याच्यामध्ये एक आदरयुक्त भीती आपल्याबद्दल असली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्रभारी पर्यवेक्षक श्री खंदारे सर यांनी शेवटी आभार मानले. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सौ वैशाली साळवे मॅडम यांनी केले.