प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी शिर्डीला भेट देऊन गुरुवारी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन!!
शिर्डी ( प्रतिनिधी) राजकुमार गडकरी
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी शिर्डीला भेट देऊन गुरुवारी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मा. खा. सुजय विखे पा., संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदीर प्रमुख विष्णु थोरात व संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते. गौतम अदानी हे मोठे उद्योगपती असल्यामुळे त्यांची सुरक्षा व्यवस्था मोठी होती.
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल व श्री साई मूर्ती देऊन केला. यावेळी मा. खा. सुजय विखे पा., उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदीर प्रमुख विष्णु थोरात व संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.