शाळेच्या विकास काम करिता निधी उपलब्ध केल्याबद्दल सदस्यांचा सत्कार.
टाकळीभान (प्रतिनिधी)
येथील जि. परिषद प्राथमिक खंडोबा वस्ती शाळेच्या वतीने शाळेच्या विकास कामाकरता निधी उपलब्ध केल्याबद्दल शाळेच्या वतीने सदस्य व दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या खंडोबा वस्ती शाळेच्या प्रांगणामध्ये पेविंग ब्लॉग तसेच शाळेला तार कंपाऊंड साठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व सदस्य, ग्रामसेवक, दानशूर व्यक्ती यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी टाकळीभान जि. परिषद शाळेचे केंद्रप्रमुख व शिक्षक शिंदे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले व या सत्काराच्या रूपाने शाळेने गावातील मान्यवर व पदाधिकाऱ्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केले.
याप्रसंगी प्रा, जयकर मगर पुढे म्हणाले शाळेसाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सहकार्य करून केलेल्या सुख सुविधांनी या शाळेचा दर्जा सुधारून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होते. येथील शाळेच्या प्रगती व विकासाकरता शिक्षकांच्या धडपडी बद्दल त्यांचे कौतुक केले . तसेच या वस्ती शाळेसाठी सोलर, उर्वरित पेविंग ब्लॉग व उर्वरित तार कंपाऊंडची मागणी असून त्यास ग्रामपंचायतने सहकार्य करण्याची विनंती केली.
याप्रसंगी ग्रामसेवक रामदास जाधव यांनी शाळेच्या प्रगतीचे कौतुक करून गावातील जिल्हा प्राथमिक शाळा व वस्ती शाळांसाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचे नेहमी याच प्रकारचे सहकार्य राहील असे आश्वासन दिले.
यावेळी ग्रा. सदस्य सौ. अर्चनाताई पवार, ग्रा. सदस्य गणेश पवार, ग्रा. सदस् भाऊसाहेब पटारे, ग्रा. सदस्य सुनील त्रिभुवन,अशोक कचे, भैय्या पठाण, शिवाजी पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रेमसिंग परदेशी, संदीप साळुंके, गोकुळ नाईक, प्रवीण बनकर, राजेंद्र म्हस्के, सचिन बनकर, किशोर पवार, काळे मामा, विजय लाड, मुख्याध्यापक अनिल कडू, शिवाजी पवार, शिरसागर सर कुमार कानडे, आहेर सर आदींसह ग्रामस्थ, पालक ,विद्यार्थी उपस्थित होते.