Breaking
ब्रेकिंग

शासनाने ग्रामीण पत्रकारांच्या समस्यांसदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा – गणेश कचकलवार; युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न

0 9 1 3 8 2

 

 

 

यवतमाळ (सत्तेचा महासंग्राम न्युज)

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पत्रकारांच्या विविध प्रश्नी शासनाने तातडीने निर्णय घेत मागण्या मान्य कराव्यात त्यासाठी लोकप्रतिनिधींनी लोकसभा, विधानसभेत पत्रकारांचा आवाज होण्याचे आवाहन युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी केले.

एकविरा देवी संस्थान हिवरा, यवतमाळ येथे उत्साहात पार पडलेल्या पहिल्या आधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महागाव उमरखेड मतदार संघाचे आमदार राजेंद्र नजरधने होते तर विचारपीठावर राष्ट्रसंत साईनाथ महाराज, माहुरचे मठाधिपती शाम महाराज भारती, पंचायत समितीचे माजी सभापती गजानन कांबळे, नाशिक विभाग अध्यक्ष शरद तांबे सह मान्यवर उपस्थित होते.

‘समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर’ असलेलं ब्रीद अंगीकारत सदैव समाजाप्रती समर्पित असलेली एकमेव संघटना युवा ग्रामीण पत्रकार संघ आज कात टाकत असून राज्यभरात अग्रेसर ठरली आहे. नांदेड व यवतमाळ या दोन जिल्ह्याने जबाबदारी उचलत अतिशय आनंदमयी व नियोजनबध्द व दिमाखादार राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (ता.१८) रोजी एकविरा देवी संस्थान हिवरा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास राज्यभरातून पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिशय कमी कालावधीत संपूर्ण  राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर युवा ग्रामीण पत्रकार संघटना पोहोचली आहे. ग्रामीण आणी शहरी या दोन्ही पत्रकारांना समान वागणूक व न्याय देण्याचा उद्देश संघटनेने ठेवला असून कुठल्याही लहान मोठा असा  भेद न करता सर्व पत्रकारांना सोबत घेऊन चालण्याचा संघाचा उद्देश श्री कचकलवार यांनी अधोरेखित करत  आगामी काळात सपूर्णं भारतभर युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जाळे निर्माण करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला

प्रसंगी विविध क्षेञातील मान्यवरांसह पत्रकारांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले यात अहमदनगर जिल्ह्याने जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले, मार्गदर्शक दिपक मेढे, प्रभंजन कनिंगध्वज यांच्या नेतृत्वाखाली अल्पावधीत संघटनेचे मोठे जाळे तयार करत पत्रकार तसेच समाजघटकांच्या  सामाजिक प्रश्नांची सोडवणूक केल्याबद्दल उत्कृष्ट जिल्हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच जिल्ह्यातील संघटनेचे मार्गदर्शक दिपक मेढे, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले, नाशिक विभाग अध्यक्ष शरद तांबे

राहुरी तालुकाध्यक्ष अशोक मंडलिक यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. माणुसकीची भिंत, सामाजिक संस्था पुसद (विशेष सामाजिक पुरस्कार), कु. माधुरी दिपक कटकोजवार (उत्कृष्ट महिला पत्रकार), युवा ग्रामीण पत्रकार संघ दिग्रस जिल्हा यवतमाळ (उत्कृष्ट तालुका पुरस्कार), आतिश गेंटलवार (युवा उद्योजक पुरस्कार) परमेश्वर पेशवे इस्लापूर (उत्कृष्ट पत्रकार),  सत्कार महामुने (उत्कृष्ट युवा पत्रकार),  पुरुषोत्तम कुडवे ग्रामपंचायत झिरपूरवाडी (उत्कृष्ट सरपंच) सौ. शितल गोविंद गावंडे (उत्कृष्ट पोलीस पाटील), जिजाऊ ज्ञानमंदिर सेमी इंग्लिश स्कूल मुखेड (उत्कृष्ट शाळा), अमृतराव दादाराव देशमुख (प्रगतशील शेतकरी),  रेणुका देवी कबड्डी क्लब माहूर (क्रीडा पुरस्कार), डॉ. अजय जाधव माहूर (वैद्यकीय सेवा), राष्ट्रसंत साईनाथ महाराज (आध्यात्मिक),  एकनाथ माधवराव डुमने (उत्कृष्ट शिक्षक), जयवंतराव भागानगरकर पाटणबोरी (उत्कृष्ट पत्रकार), दिपकराव मेढे अहमदनगर (उत्कृष्ट पत्रकार) करण घोंगडे वाशिम (सामाजिक) वसंत कपाटे माहूर (उत्कृष्ट पत्रकार),  प्रभाकर पांडे नांदेड (उत्कृष्ट पत्रकार), लक्ष्मण टेकाळे दिग्रस (उत्कृष्ट पत्रकार), विनोद कनाके केळापूर (उत्कृष्ट पत्रकार),  शरद तांबे अहमदनगर (उत्कृष्ट पत्रकार), बाळकृष्ण भोसले अहमदनगर (उत्कृष्ट पत्रकार),  सतीश आकुलवार चंद्रपूर (उत्कृष्ट पत्रकार), रितेश पुरोहित महागाव (उत्कृष्ट पत्रकार), भगवान कांबळे धर्माबाद (सामाजिक पुरस्कार), जयश्री घोडके, बीड (पत्रकारीता) श्री विजय आमले माहूर, भाऊराव कोटकर वर्धा, लुकमान आहेमद लतिफ आहेमद पठाण दिग्रस, राजू सोनुने, पुसद, कांता राठोड पुणे, गणेश महाडिक पुणे (पत्रकारीता), अशोक मंडलिक, राहुरी, अहमदनगर (उत्कृष्ट पत्रकार), सचिन वैद्य, वर्धा, राजू राठोड पुसद, श्री संजय करवटकर राळेगाव, प्रदीप ईश्वरमलजी मेहता, दिग्रस यांना पुरस्कार पत्रकारीता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अहमदनगर जिल्हा सचिव राजेंद म्हसे, राहुरी तालुका सचिव रमेश जाधव, खजिनदार कमलेश विधाते,  दिपक मकासरे, प्रमोद डफळ, नाना जोशी सह अनेक मान्यवर उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे