टाकळीभान ते कमलापूर व टाकळीभान ते खिर्डी रोडच्या कामासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना निवेदन .
टाकळीभानू (प्रतिनिधी)
टाकळीभान ते कमालपूर व टाकळीभान ते खिर्डी रोडच्या कामासाठी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांना निवेदन देण्यात आले,
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खा. भाऊसाहेब वाकचौरे आभार दौऱ्यानिमित्त टाकळीभान येथे आले असता टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने टाकळीभान ते कमालपूर रस्ता तसेच टाकळीभान ते खिर्डी रोड या दोन्ही रोडच्या रस्त्याच्या कामाचे निवेदन देण्यात आले. या दोन्ही रोडची दयनीय अवस्था झाली असून रोडला मोठे खड्डे पडले आहेत, या रोडवर काही नागरिक रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पडून जखमी झाले असून असून अपघात ही झाले आहेत. टाकळीभान ते कमालपूर हा रस्ता पुढे संभाजीनगर जिल्ह्याला जोडणारा दळणवळणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा रस्ता आहे.
तसेच टाकळीभान खिर्डी रोड या रोडलाही दळणवळण वाहतूक मोठ्या प्रमाणावर असून गणेश खिंड व शिंगणापूर सारखे देवस्थान यांना जोडणारा हा रस्ता आहे. या दोन्ही रस्त्याची दयनीय अवस्था संपून या रस्त्यांसाठी खासदार निधीतून सदर रस्त्यांची कामे करावी या मागणीचे निवेदन खा. वाकचौरे यांना ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले.
याप्रसंगी निवेदन देताना अर्जुन राऊत, सेवा संस्थेचे चेअरमन एकनाथ पटारे, शिवाजी धुमाळ,संजय पटारे, रेवननाथ कोकणे,अक्षय कोकणे, बबलू वाघुले, दिगंबर भवार, विकास मगर, नानासाहेब ब्राह्मणे ,विजय चौधरी , मच्छिंद्र पटारे, सुजित बोडखे, संदीप पटारे, सुदाम पटारे, अनिल पटारे, रवींद्र पटारे, दामोदर शिंदे, सुरेश पटारे, नवनाथ खंडागळे आदी उपस्थित होते. यावर निवेदन देणाऱ्या ग्रामस्थांच्या सह्या आहेत. याप्रसंगी निवेदन स्वीकारते वेळी रोहित वाकचौरे, सदाशिव पटारे, राधाकिसन बोरकर, सचिन बडदे,शिवाजी दौंड, बाबासाहेब कुशेकर, निखिल पवार आदी उपस्थित होते.