आश्वी खुर्द येथे डॉ. सुजय विखे पा. यांच्या हस्ते श्रीराम मंदिर व इतर मंदिरांच्या जीर्णोद्धार बांधकामाचे भूमिपूजन संपन्न!
शिर्डी ( प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील ऐतिहासिक प्रभु श्रीराम, श्री दत्त आणि पुंजाआई माता मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी २० लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे नुकतेच या मंदिर जिर्णोद्धार बांधकामाचे भूमिपूजन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
आश्वी खुर्द येथील ऐतिहासिक असे प्रभु श्रीराम, श्री दत्त आणि पुंजाआई माता मंदिर मोडकळीस आले होते. त्यामुळे गावातील जेष्ठ कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनाखाली गावातील तरुणांनी एकत्र येऊन याबाबत मंत्री विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील व सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्याकडे निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आग्रह धरला होता. विखे पाटील कुटुंबाचे आश्वी खुर्द गावावर विशेष प्रेम असल्याने मंत्री विखे पाटील यांनी मंदिर जिर्णोद्धार करण्यासाठी २० लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला.
नुकतेच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी आश्वी खुर्द येथे आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते मंदिर जिर्णोद्धार बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नेते, तरुण कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान आश्वी खुर्द गावाशी विखे पाटील कुटंबाचा एक वेगळा जिव्हाळा असून गावच्या विकास कामाला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही डॉ. विखे पाटील यांनी दिली आहे.