ग्रामपंचायतकडे माहिती अधिकाराचा अर्ज दाखल केला म्हणून सरपंच बाईच्या दिराकडुन फिर्यादीस जीव मारण्याची धमकी.
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
टाकळीभान ग्रामपंचायतचा माहिती अधिकाराचा अर्ज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाऱ्याकडे तक्रार अर्ज दाखल केला म्हणून टाकळीभान ग्रामपंचायतच्या सरपंच अर्चना रणनवरे यांचे दीर भागवत दिनकर रणनवरे यांनी या तक्रारीचा राग धरून फिर्यादी ग्राम. सदस्य कविता रणनवरे यांचे पती मोहन सोनाजी रणनवरे यांनी भागवत दिनकर रणनवरे यांचेवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की फिर्यादी मोहन सोनाजी रणनवरे यांचे चुलते गयांनद मोहन रणनवरे यांना 29 सप्टेंबर 2024 रोजी भागवत दिनकर रणनवरे टाकळीभान बस स्टैंड वर भेटले असता फिर्यादीच्या चुलत्यास भागवत दिनकर रणनवरे म्हणाले की तुमच्या पुतण्याला समजून सांगा नाहीतर रस्त्यावर आपटून मारू असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली असून त्याप्रमाणे फिर्यादी मोहन सोनाजी रणनवरे यांनी 351(2),351(3) प्रमाण गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पो. कॉ. सुनील त्रिभुवन हे करत आहे.