राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदाजीत दहा कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न! राहता कृषी उत्पन्न बाजार समितीला अत्याधुनिक कोल्ड स्टोरेज व शेतकरी भवन बांधण्यासाठी देणार निधी — पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री ना. अब्दुल सत्तार, पारदर्शक कारभारामुळे या बाजार समितीची वाढली मोठी उलाढाल–ना. राधाकृष्ण विखे पा.
शिर्डी (प्रतिनिधी )
राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजसाठी 11 कोटी रुपये तर आगामी काळात बाजार समितीला शेतकरी भवन बांधण्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात येतील असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकास मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी दिले.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मुख्य बाजार आवारातील संरक्षण भिंत, अंतर्गत सिमेंट काँक्रेट रस्ते, वॉटर ड्रेनेज लाईन, ऑक्शन प्लॅटफॉर्मचे काँक्रिटीकरण ,कांदा शेड या अंदाजित १० कोटी रु खर्चाच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ पणन मंत्री ना अब्दुल सत्तार व महसुल तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी करण्यात आला. यावेळी राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा
व पणन मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शेती महामंडळाची 24 एकर जमीन राहता कृषी उत्पन्न बाजार समितीला हस्तांतरित करण्यात आली .जमीन हस्तांतरणाचा सातबारा बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून माजी मंत्री आणासाहेब म्हस्के, पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती आणासाहेब कडू, उपनिबंधक गणेश पुरी, शिर्डीचे प्रांताधिकारी मानिक आहेर ,यांच्या सह सर्व सदस्य ,सचिव सुभाष मोटे, संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नामदार अब्दुल सत्तार म्हणाले की ,शिर्डी व राहता परिसरात डाळिंब व फुलांचे मोठे मार्केट आहे. तेव्हा या परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल हा खराब न होता सुरक्षित राहावा यासाठी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत अत्याधुनिक कोल्ड स्टोरेज ची गरज आहे व त्यासाठी 11 कोटी रुपये मंजूर करत असून येथे बाजार समितीत शेतकरी भावनांची ही गरज असून त्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर करत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. व या शेतकरी भावनांच्या भूमिपूजनासाठी मी स्वतः उपस्थित राहीन असेही आश्वासन यावेळी दिले. आपण राज्याचे कृषिमंत्री असताना सावळीविहीर येथील कृषी विभागाचे 75 एकर जमीन पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी पशुसंवर्धन विभागाकडे हस्तांतरित केली याची आठवणही यावेळी पणन मंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणातून करून दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की नामदार विखे हे कार्यकर्ते घडवणारे नेते आहेत. त्यांनी माझ्यासह अनेक नेते घडवले. असेही आठवण त्यांनी यावेळी करून दिली. यावेळी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राहता कृषी उत्पन्न बाजार समिती ही अतिशय पारदर्शक कारभारामुळे अल्पावधीतच राज्यात नावारूपाला आली आहे. या बाजार समितीची उलाढाल 540 कोटींची असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राहता तालुक्यात दोन कोटी अनुदान देण्यात आले आहे .
नामदार विखे पाटील म्हणाले की, शिर्डी सावळविहीर एमआयडीसी मध्ये 1000 कोटीची गुंतवणूक होऊन 2000 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे अनेक निर्णय घेण्यात आले असून गोदावरी कालव्यातून तालुक्यातील सर्व पाझर तलाव, कालवे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या सूचना देण्यात आले आहेत, गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदेव चौधरी यांनी तर आभार संतोष गोरडे पाटील यांनी मानले .या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक अधिकारी कर्मचारी व्यापारी, सभासद, शेतकरी ,बांधव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.