Breaking
ब्रेकिंग

ग्रामसभेला सरपंच उपसरपंच व एक सदस्य उपस्थित असल्याने ग्रामसभेला गैरहजर असलेल्या सदस्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव यावेळेस मांडण्यात आला.

सदस्यांवर कायदेशीर कारवाई खरंच होईल का ? टाकळीभानच्या ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण

0 9 1 4 0 0

 

 

 

 

 

 

टाकळीभान (दिलीप लोखंडे)

टाकळीभान ग्रामपंचायतीची ग्रामसभा  ३० ऑगस्ट रोजी पार पडली. वाचनालयाच्या ईमारतीच्या जागेचा प्रश्न प्रतिष्ठेचा झाल्याने ग्रामसभेने मारुती मंदिराजवळील जागेवर एकमताने मोहर लावली.

सत्तरा सदस्य आसले तरी ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच व एक सदस्य उपस्थित आसल्याने ग्रामसभेला गैरहजर आसलेल्या सदस्यांवर कायदेशिर कारवाई करण्याचा ठराव यावेळी मांडण्यात आला. सर्व ठराव ग्रामसभेच्या अध्यक्षा सरपंच अर्चना रणनवरे यांनी मंजुर केल्याची घोषणा केली.

टाकळीभान ग्रामपंचायतीची ग्रामसभा मोठ्या गदारोळात होण्याची चर्चा सुरु होती. माञ प्रत्यक्षात ग्रामसभेकडे ग्रामस्थांसह प्रश्न उपस्थित करणारांनी पाठ फिरवल्याने ग्रामसभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी आ. सत्यजित तांबे यांनी अद्यावत वाचनालयासाठी ४५ लाख रुपयाचा निधी जागेच्या अंतर्गत वादामुळे पडुन आसल्याने यावर ग्रामसभेत वर हात करुन मतदान घेतले. उपस्थितांनी मारुती मंदीराजवळील जागेला एकमताने हात उंचावुन सहमती दिल्याने वाचनालयाच्या जागेचा तिढा सुटला आहे.

यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी जगतगुरु तुकाराम महाराज मंदिरासाठी भरीव मदत देणारे खा. भाऊसाहेब वाकचौरे, माजी खा. सदाशिव लोखांडे, आ. सत्यजित तांबे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश आदीक यांच्या आभिनंदनाचा ठराव मांडाला तर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे यांनी आ. लहु कानडे यांनी भरीव विकास निधी दिल्याने आ. कानडे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

आनिल पटारे यांनी खेळाडुंसाठी भव्य तालुकास्तरीय क्रिडा संकुल उभारण्यासाठी शेती शाळेच्या ४ हेक्टर जागेची मागणी केली. मंगलताई कोकणे यांनी महीलांनी ग्रामसभेला उपस्थित रहाण्याचे अवाहन करुन ऐकोप्याने गावाचा विकास करावा असे आवाहन करुन ग्रामपंचायतच्या विकास कामाचे टेंडर आॕनलाईन पध्दतीने काढण्यात यावेत आशी मागणी केली.

रामेश्वर आरगडे यांनी निधी उपलब्ध आसतानाही बांधकाम रखडलेल्या बस स्टँड मुळे महीला व महाविद्यालयीन विद्यार्थिनीची कुचंबना होत आसल्याने आवश्यकता नसताना जुने बस स्टँड पाडणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा व नवीन बांधकामासाठी आडकाठी करणारांवही कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी केली. ग्रामसभेत मांडलेल्या ग्रामस्थांच्या मागणीला नेहमीच केराची टोपली दाखवली जात आसल्याचा आरोप करुन बंद आसलेला आर.ओ. फिल्टर पञकार भवनाच्या जागेचा प्रश्न उपस्थित केला. तर काकासाहेब कोकणे यांनी बंधार्यांच्या निधीबाबत शंका व्यक्त करुन निधीचा योग्य वापर करण्याची मागणी व्यक्त केली. यावेळी जितेंद्र पटारे यांनीही चर्चेत सहभाग घेतला. शेवटी सरपंच अर्चना रणनवरे यांनी सर्व ठराव मंजुर करीत आसल्याचे घोषित केले.

यावेळी माजी सरपंच भाऊसाहेब मगर, बंडु पटारे, सोसायटीचे चेअरमन एकनाथ पटारे, बाबासाहेब बनकर, देवदास कोकणे, जयकर मगर, भाऊसाहेब पटारे, अॕड. धनराज कोकणे, अप्पा रणनवरे, अनिल बोडखे, बाळासाहेब शेळके, महेंद्र संत, दादासाहेब कोकणे, विनोद मगर, सुधिर मगर, पप्पु रणनवरे, आमोल पटारे, अक्षय कोकणे, आरोग्य अधिकारी डाॕ. राम बोरुडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

चौकट ——- सरपंचाने ग्रामस्थांच्या समस्या सोडण्यासाठी ,रोज ग्रामपंचायत कार्यालयात 11 ते 2 पर्यंत हजर राहून दैनंदिन कामकाज पाहावे,

—————————–

चौकट:— त्या गैरहजर सदस्यांवर कायदेशिर कारवाई व्हावी.

———————————————————–

ग्रामपंचायतीच्या सहा प्रभागातुन १७ सदस्य त्या त्या प्रभागातील नागरीकांच्या मुलभुत समस्यांची सोडवणुक व्हावी म्हणुन नागरीकांनी निवडुन दिलेले आहेत. माञ त्यापैकि सरपंच अर्चना रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे व एक सदस्य हे तीनच सदस्य नागरीकांच्या या हक्काच्या व्यासपिठात समस्या ऐकण्यासाठी उपस्थित होते. उर्वरीत १४ सदस्यांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवली आहे. त्यांना त्या त्या प्रभागातील नागरीकांच्या समस्यांबाबत देणेघेणे नसल्याने त्या सदस्यांनी सदस्य पदाचे राजिनामे द्यावेत. ग्रामसभेचा गैरहजर सदस्यांबाबतचा ठराव करण्ययात यावा व योग्य त्या कायदेशिर कारवाईसाठी वरीष्ठांकडे पाठवण्यात यावा अशी मागणी यावेळी रामेश्वर आरगडे यांनी ग्रामसभेला करताच एकमुखी मान्यता देण्यात आली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 4 0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे