साई आश्रम भक्तनिवास येथे सुमारे दहा लाख रुपये किमंतीच्या देणगी स्वरूपात आलेल्या नविन वॉटर प्युरीफायर प्लांटचे उद्घाटन !
शिर्डी ( प्रतिनिधी)
आज रविवार दि. २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साई भक्तांना शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावे याकरीता श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साई आश्रम (१००० रुम) भक्तनिवास येथे १० लाख रुपये किंमतीचे देणगी स्वरुपात आलेल्या नविन अत्याधुनिक वॉटर प्युरीफायर प्लांटचे संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व देणगीदार साईभक्त अरुण तिवारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उप कार्यकारी अभियंता दिनकर देसाई, मॅकेनिकल विभाग प्रमुख अतुल वाघ, साई आश्रम भक्तनिवास विभागाचे प्र. अधिक्षक विजय वाणी आदी उपस्थित होते.
देणगी स्वरुपात आलेल्या नविन अत्याधुनिक वॉटर प्युरीफायर प्लांटची क्षमता २००० लिटर प्रती तास आहे. वॉटर प्युरीफायर प्लांटच्या उद्घाटनानंतर देणगीदार साईभक्त यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री साई मूर्ती शाल देऊन सत्कार केला.