Breaking
ब्रेकिंग

सावळीविहीर येथील श्री परसराम महाराज पतसंस्थेच्या मयत सभासदांच्या वारसदाराला मिळाले विम्याचे दोन लाख रुपये! ————————————– चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालक मंडळाच्या उपस्थितीत विमा रकमेचा धनादेश वारसदार शितल सचिन शेलार यांच्याकडे सुपूर्त!

0 9 1 3 7 8

 

 

शिर्डी( सत्तेचा महासंग्राम न्युज)

 

राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील श्री परशुराम महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या मयत सभासदाच्या वारसाला दोन लाख रुपयाचा विमा मंजूर होऊन दोन लाखाचा धनादेश नुकताच मयत सभासदाच्या पत्नी शितल सचिन शेलार यांना पतसंस्था कार्यालयात चेअरमन विजयराव काळे व व्हा. चेअरमन निलेश सांगळे , सर्व संचालक मंडळ, सभासद, कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

सावळीविहीर वाडी येथील या पतसंस्थेचे सभासद सचिन गोरख शेलार यांचा चार महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. श्री परसराम महाराज पतसंस्था आपल्या सभासदांचा सन 2003 पासून दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे विमा उतरवत आहे. मयत सचिन गोरक्ष शेलार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कागदपत्राची पूर्तता करून त्यांच्या पत्नी शीतल सचिन शेलार यांना या विमा कंपनीकडून दोन लाख रुपये विमा मंजूर होऊन त्या रकमेचा धनादेश नुकताच या पतसंस्थेच्या कार्यालयात त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना पतसंस्थेचे चेअरमन विजयराव पुंजाजी काळे म्हणाले की आमची पतसंस्था हि व्यवसाय व व्यवहार करत असतानाच सामाजिक कार्य करत असते व या कार्यातूनच सर्व सभासदांचा विमा उतरवला जातो. जर दुर्दैवाने असा अपघाती मृत्यू झाला तर त्या सभासद वारसदाराला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांना या विम्यामुळे थोडा आर्थिक हातभार मिळावा म्हणून पतसंस्था सभासदांचा विमा उतरवित असते. यापूर्वीही या पतसंस्थेचे अरुण रामभाऊ मगर यांनाही अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या वारसदारांना दोन लाख रुपयांचा विमा मंजूर झाला होता व ती रक्कम त्यांच्या वारसदारांना देण्यात आली होती. असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मयत सभासदाची वारसदार पत्नी शितल सचिन शेलार यांनी मला विम्याचे हे पैसे मिळाल्यामुळे मोठा आर्थिक हातभार लागला आहे. आम्हाला दुःख आहेच, पण या पतसंस्थेच्या सामाजिक कार्यामुळे हि विमा रक्कम मिळाली. त्यामुळे आमचे मोठे आर्थिक संकट दूर होणार आहे. ही मदत मिळण्याकामी विमा कंपनी व या विमा कंपनीचे प्रतिनिधी मिनीनाथ तेलोरे ,या पतसंस्थेचे चेअरमन विजयराव काळे ,व्हा. चेअरमन निलेश सांगळे, व्यवस्थापक भारत जनार्दन जपे, सर्व संचालक मंडळ, सर्व कर्मचारी, सभासद मंडळ यांचेही मोठे सहकार्य मिळाले. त्या सर्वांचे त्यांनी यावेळी धन्यवाद मानले. यावेळी या पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद ,कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे