वडाळा महादेव येथे आरोग्य शिबीर.
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे इंडियन रेड क्रॉस सोसायटी , ग्रामपंचायत वडाला महादेव , प्रा आ केंद्र माळवाडगाव यांच्याकडून आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. १०० पेक्षा जास्त रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले.
यावेळी मा. प्रांत सावंत साहेब , मा तहसीलदार साहेब , तालुका आरोग्य आधिकारी डॉ शिंदे , वैद्यकीय अधिकारी डॉ उन्मेश लोंढे , सरपंच पवार मॅडम , कृष्णा पवार , अविनाश पवार , सर्व मान पदाधिकारी वडाळा महादेव , डॉ स्वप्नील पुरणाले , डॉ वाडेकर , इंडियन रेड क्रॉस सोसायटी चे श्री साळवे व सर्व सन्माननीय सदस्य ,सेवानिवृत्त मुख्याध्यपिका साळवे मॅडम सर्व प्रा आ केंद्र माळवाडगाव येथील स्टाफ , आशाताई उपस्थित होते. श्रीमती सातपुते सिस्टर यांच्या उत्तम आरोग्यसेवेबाबत व पदोन्नती बाबत विशेष अभिनंदन करण्यात आले.