वरवंडी गावात ध्वजारोहण उत्साहात संपन्न.
आश्वी (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व प्रवरा माध्यमिक विद्यालयात स्वतंत्र दिना निमित्ताने ध्वजारोहण उत्साहात पार पडले प्रसंगी गावातील अनेक नागरिक सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य शाळेत उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने झाली प्रारंभी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ. किरण गणेश गागरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले त्यानंतर प्रवरा माध्यमिक विद्यालयात एकनाथ वर्पे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष एकनाथ वर्पे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक लक्ष्मण दिघे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांची भाषणे झाली विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथी व ग्रामस्थांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी तंटामुक्तीचे अध्यक्ष लक्ष्मण बस्ते होते यानंतर गत वर्षेभरात ज्यांनी शाळेसाठी मदत केली अशा सर्व नागरिकांचा सन्मान करण्यात आला त्यात वर्षभर शाळेसाठी मोफत शितपेय पुरवणारे अण्णासाहेब निवृत्ती गागरे यांचा मुख्याध्यापकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्यानंतर अश्वीच्या धन्वंतरी हॉस्पिटलाचे डॉ.गणेश गायकवाड यांनी शाळेसाठी पुढे मुलांना कायमस्वरूपी थंड पाणी पिण्यास मिळावे म्हणून वॉटर डिस्पेन्सर दिले त्यांचे सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात आले. पावसाळ्यात शाळेत पाणी साचत असल्याच्या समस्येवर तोडगा काढत सुभाष गागरे ,सतीश गागरे यांनी यासाठी शाळेच्या आवारात पाणी साठणार नाही यासाठी एक लाख पस्तीस हजार खर्च करून पाण्याचे भूमिगत चर बनविले, त्याचप्रमाणे गौतम वर्पे यांनी शाळेतील विविध कामांमध्ये मोफत योगदान दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा वार्षिक निधीतून दिलेल्या इंटरॅक्टिव्ह पॅनलचा यावेळी उल्लेख झाला त्यानंतर ग्रामपंचायती मार्फत झालेले कामे हप्सा मोटर दोन दोन एच पी ,ब्लॉक नवीन स्वच्छतागृह, इंटरॅक्टिव्ह पॅनल, सीसीटीव्ही ,घनकचरा व्यवस्थापन ,सोलर पॅनल दिल्याबद्दल सरपंच सौ किरण गणेश गागरे उपसरपंच सौ पोर्णिमा नवनाथ भोसले सर्व सदस्यांचे विशेष आभार मानून सर्व सत्कारमूर्तीचे ऋण व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांना स्नेहभोजन देण्यात आले यासाठी प्रयत्न करणारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब वर्पे लक्ष्मण बस्ते बालम शेख कैलास बबन वर्पे ,गणेश वर्पे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.