Breaking
ब्रेकिंग

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूची चौकशी करा..राहुल रेळे

0 9 1 3 8 2

 

राहाता (सत्तेचा महासंग्राम न्युज)

*मुंबई विद्यापीठाचे अकार्यक्षम कुलगुरू रविंद्र कुलकर्णी यांना निलंबित करण्यासाठी छावा ब्रिगेड राज्यव्यापी मोहीम राबवणार.*

विद्यार्थ्यांच्या असंख्य समस्या, शिक्षणाचा ढासळता दर्जा,आर्थिक आणि प्रशासकिय घोटाळे, भ्रष्ट संस्थाचालकांना राष्ट्रसेवेची संधी देण्याच्या नावाखाली मोकळीक, कायद्याचे बेसुमार उल्लंघन, अपात्र अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, सिनेट निवडणुकांचा गोंधळ, खोट्या माहितीच्या आधारे संलग्नता , दर्जाहीन चौकशी समित्यांवर वारेमाप उधळपट्टी , शिक्षकांना भेट देण्यास मुद्दाम नकार? हे सगळं पाहून हे नेमके मुंबई विद्यापीठ आहे का, असा प्रश्न आता जनसामान्यांच्या मनात येत आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना यांनी शेकडो निवेदने देवुन सुध्दा मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुन्नी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत.अशा निष्क्रिय मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंचा उपयोग? त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी नागरिकांकडून मा.राज्यपाल महोदयांना व्हावी म्हणून अनेक जण पुराव्यांसह समोर येत आहेत.

विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी आणि सर्व सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. विद्यापीठातील विविध मूलभूत प्रश्नांवर अनेकांनी लक्ष वेधले आहे . मुंबई विद्यापीठात डॉ. श्री. रविंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती झाल्यापासून सातत्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी आणि सर्व सामान्य नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

 

तक्रार निवारण समितीचे निकाल तीन महिन्यात नाहीत ? चौकशी समित्यांचे अहवाल २ वर्षाहून अधिक काळ प्रलंबित, सामाजिक कार्यकर्त्याने जोकरचा मास्क देवून देखील सुधारणा नाही. मा. राज्यपाल महोदयांनी महत्त्वपूर्ण प्रश्नांवर कार्यवाहीसाठी पाठविलेल्या पत्रांना केराची टोपली दाखविण्याचे दुर्दैवी प्रकार . हे जनता निश्चितच खपवून घेणार नाही!

अपात्र असणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांवर कुलगुरुंचे योग्य नियंत्रण नसल्याने विद्यापिठात भ्रष्टाचाराचे जाळे पसरत आहे. शासनाच्या अनेक विभागांनी महाविद्यालयांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारांबद्दल आणि अनियमिततेबाबत लेखी कळवून देखील त्याची तसदीही कुलगुरूंनी घेतली नाही. विद्यार्थ्यांकडून शुल्क घेता? मग सोई सुविधा का नाहीत? विद्यापीठांतील विविध समस्यांच्या संदर्भात अनेकांनी वारंवार निवेदने दिली, आंदोलने केली. परंतु मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कामात कुठलीही सुधारणा नाही.

तक्रारदारांना उद्धट पणाची वागणूक देऊन भेट देण्याचे वर्षवर्षभर टाळणं, मा.राज्यपाल महोदयांच्या कार्यालयातील पत्रांना केराची टोपली दाखवणं, असे वर्तन असणाऱ्या मुंबई विद्यापिठाच्या कुलगुरूंची सखोल चौकशी करून त्यांचं थेट निलंबन करावं, अशी मागणी करण्याची आता वेळ आली आहे.

अनेक तक्रारी करूनही या कुलगुरूंच्या वागणुकीत फरक पडत नाही. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही.त्यांना कोणाचे अभय आहे, असा सवाल यावेळी अनेकजण करत आहेत.

कुलगुरूंच्या वागण्यात आणि कार्यात सकारात्मक बदल न झाल्यास त्याचे परिणाम सत्ताधाऱ्यांनासुद्धा निश्चितपणे भोगावे लागतील असेही मत छावा ब्रिगेडचे सचिव श्री. राहुल रेळे यांनी व्यक्त केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे