श्रीरामपूर मतदार संघातून ज्येष्ठ विधिज्ञ प्रकाश संसारे यांची काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी
राहुरी (प्रतिनिधी )
देवळाली प्रवरा येथील ज्येष्ठ विधिज्ञ व पब्लिक नोटरी प्रकाश संसारे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे श्रीरामपूर या अनु. जातीसाठी राखीव असलेल्या मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची मागणी केली आहे
श्री संसारे हे राहुरी व अहमदनगर न्यायालयात गेल्या २७ वर्षाहून अधिक काळ वकीली व्यवसाय करीत आहेत. तसेच नोटरी पब्लिक म्हणून समाजामध्ये सुपरिचित आहेत. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या मोठ्या गावातील रहिवासी असल्याने श्रीरामपूर मतदार संघाला राहुरी तालुक्यातील जोडलेल्या ३२ गावात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राज्यातील नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या भीमशक्ती संघटनेचे ते प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.
जन सामान्य वर्गात ते गोर गरीबांचे वकिल म्हणून सुपरिचित आहेत. अनेक सामाजिक अंदोलनात नेहमीच ते अग्रेसर आहे या खेपेला राहुरी तालुक्यातील ३२ गावात उमेदवारी मिळावी ही येथील स्थानिकांची मागणी आहे. या ३२ गावातून सव्वा लाखाच्या पुढे मतदार असून सातत्याने श्रीरामपूर भागाला संधी मिळत असल्याने या ३२ गावांना नेहमीच सापत्न वागणूक मिळत आली असल्याचे जनतेतून सांगितले जाते त्यानुषंगाने श्री संसारे यांचा या भागात असलेला दांडगा जनसंपर्क यामुळे या भागातील स्थानिकांनीही संसारेंच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला आहे. पर्यायाने जनतेचीही इच्छा यानिमित्ताने पुर्णत्वास जाणार आहे.