राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील श्री नर्मदेश्वर सेवाधामचा वीस लाख रु. खर्च करून विकास व त्याचे लवकरच उद्घाटन करण्याचे मा. खा. सुजय विखे पा. यांचे आश्वासन– महंत आत्माराम गिरीजी महाराज उर्फ अशोक महाराज निर्मळ
राहाता ( प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र निर्मळ पिंपरी येथील श्री नर्मदेश्वर सेवा धाम येथे राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे वीस लाख रुपये निधीतून मंदिर व परिसराच्या विविध विकास कामांचे उद्घाटन लवकरच करण्यात येईल. असे आश्वासन डॉक्टर सुजय दादा विखे यांनी नुकतेच बाभळेश्वर येथे भेटी प्रसंगी दिले असल्याची माहिती निर्मळ पिंपरी येथील श्री नर्मदेश्वर सेवा धामचे महंत आत्माराम गिरीजी महाराज उर्फ अशोक महाराज निर्मळ यांनी दिली.
राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील श्रीक्षेत्र नर्मदेश्वर सेवाधाम येथील महंत आत्माराम गिरीजी महाराज हे नुकतेच यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ द्वारका बेट द्वारका सोरटी सोमनाथ आदी तीर्थस्थानाचे दर्शन घेऊन परत श्री नर्मदेश्वर सेवा धाम येथे पोहोचले आहे. आणि लगेचच त्यांनी मा. खा. डॉक्टर सुजय विखे पाटील यांची बाभळेश्वर येथे एका कार्यक्रमात भेट घेतली व श्री नर्मदेश्वर सेवा धाम साठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष निधीतून वीस लाख रुपये निधी उपलब्ध झालेला आहे. पुढील कारवाईसाठी आपण संबंधितांना योग्य त्या सूचना द्याव्यात. अशा आशयाचे पत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांना दिले असता व श्री नर्मदेश्वर सेवाधामच्या विकासा संदर्भात चर्चा केली असता डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यावेळी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथे लवकरच 20 लक्ष निधीच्या विकास कामांचे उद्घाटन लवकरच करण्यात येईल.व येथील परिसर सुंदर, रमणीय असा करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. असे आश्वासन देत जिल्ह्यात तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात, देशात धार्मिक व आध्यात्मिक कार्य करत असणाऱ्या श्री नर्मदेश्वर सेवाधामचेही यावेळी डॉक्टर सुजय विखे पा.यांनी कौतुक केले. यावेळी महाराजांचे काही साधक उपस्थित होते.