घोगरगांव येथे विशेष ग्रामसभा बोलून वाळू लिलाव न करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला…
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्यूज नेटवर्क डिजिटल मिडिया
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
-नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथे विशेष ग्रामसभा बोलून वाळू लिलाव न करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला,
घोगरगाव येथे 14/12/2023 रोजी उपजिल्हाधिकारी विकास पाटील, तहसीलदार बिरादार, गट विकास अधिकारी पाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच सरपंच सौ विद्याताई बहिरट व उपसरपंच सौ किरण शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली वाळू लिलाव विशेष ग्रामसभा घेऊन मंजूर करण्यात आला.
नेवासा तालुक्यातील घोगरगाव हे राजकारणाला कलाटणी देणारे गाव असून या गावाला गोदावरी नदीची देणगी लाभली असल्याने या ठिकाणी वाळूची देणगी लाभली आहे. म्हणून महसूल विभाग यांनी विशेष लक्ष घालून सर्वसामान्यांना वाळू स्वल्पदरात मिळावी,व वाळू तस्करी रोखण्यासाठी या शासन धोरणासाठी, घोगरगाव या ठिकाणी येऊन व विशेष ग्रामसभा घेऊन वाळू लिलाव मंजूर ठराव केला होता.
परंतु हा झालेला लिलाव ठराव ग्रामस्थांना मान्य नसल्याने त्यांनी सरपंच यांच्याकडे तक्रार नोंदवून हा वाळूचा लिलाव ठराव आम्हाला मान्य नाही. ग्रामस्थांची दखल घेत सरपंच व उपसरपंच यांनी 10 जानेवारी 2024 रोजी सरपंच विद्याताई बहिरट यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली, त्यामध्ये वाळू लिलाव ठराव न होण्याबाबत अशी सूचना प्रभाकर पटारे यांनी मांडून त्यास अनुमोदन विष्णू आव्हाड यांनी देऊन सर्वानुमती ठराव मंजूर करण्यात आला.जर वाळू पुन्हा सुरू झाली तर आणि सर्व ग्रामस्थ या विरोधात याचिका दाखल करू कारण या वाळू उपशामुळे रस्ते खराब होतात, नदीत पाणी जिरत नाही,सर्वसामान्य लोकांना शासकीय नियमाप्रमाणे वाळूही मिळत नाही यासाठी आमचा विरोध आहे. परंतु ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 7 याप्रमाणे तीन महिन्यांमध्ये ग्रामपंचायतचा ठराव बदलता येत नाही अशी माहिती ग्रामस्थांना सरपंच सौ.विद्याताई बहिरट यांनी दिली
याप्रसंगी महसूल विभागाचे कामगार तलाठी यशवंत लोंढे, प्रभाकर पटारे, कमलाकर शिरसाट, संजय शिंदे, भाऊसाहेब कडू, विलास पटारे, देविदास बहिराट संभाजी पटारे, दिलीप टेकाळे, बशीर भाई शेख, माधव बहिरट, ज्ञानदेव टेकाळे, आप्पासाहेब शिंदे, तानाजी बहिरट, भाऊसाहेब शिरसाट, दिवान पटारे, विलास पटारे, संतोष शिरसाट, कामगार तलाठी देविदास लोंढे, ग्रामसेवक यशवंत तुपे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते