केंद्रीय आयुष( स्वतंत्र प्रभार)आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार श्री प्रतापराव जाधव यांची शिर्डीला भेट !घेतले साई दर्शन!
शिर्डी ( प्रतिनिधी)
केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटूंब कल्याण, राज्यमंत्री नामदार श्री प्रतापराव जाधव यांनी श्रावणी तिसऱ्या सोमवारी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यांनी श्री द्वारकामाईत जाऊन तिथेही मनोभावे दर्शन घेतले.साईदर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री साई मूर्ती व शाल देऊन सत्कार केला. यावेळी उप मुख्यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव हे मेहकर येथून समृद्धी महामार्गाने शिर्डी येथे आले. शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन ते प्रवरानगर येथील डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सभागृहात होणाऱ्या भारतातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 124 व्या जयंती समारंभासाठी प्रवरानगर कडे रवाना झाले . त्यानंतर ते संगमनेर येथील एका योगा स्कूल ला भेट देऊन नंतर मेहकर कडे रवाना होणार आहेत.