श्रीलंकेतील कोलंबो येथील वीस साईभक्तांनी शिर्डी येथे येऊन घेतले श्री साईबाबांचे दर्शन!! साई संस्थांनच्या वतीने सर्वांचा करण्यात आला सत्कार!!
शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनाला देश-विदेशातील साईभक्त मोठ्या संख्येने नेहमी येत असतात.
आज मंगळवार, दिनांक २३ जुलै २०२४ रोजी श्रीलंका येथील २० साईभक्तांनी शिर्डी येथे येऊन श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. तसेच शिर्डीतील श्री द्वारकामाई, श्री गुरुस्थान आदींसह लेंडी बागेत जाऊन त्यांनी मनोभावे दर्शन घेतले. नंदादीप जवळ ओम साई नमो नमः म्हणत साईंची भक्ती केली. दर्शनानंतर साईसंस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा शाल देऊन सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. यावेळी श्रीलंकन साईभक्तांनी सांगीतले की, श्रीलंकेतील कोलंबो शहरात आमचे श्री साईबाबांचे मंदिर आहे . या मंदिराची निर्मिती १९६६ साली केलीली असुन या मंदिरात भारतातील जयपुर येथुन नेलेली ५ फुट उंचीची व ५ हजार किलो वजनाची श्री साईबाबांची मुर्ती स्थापन केलेली आहे. आम्ही सर्व या मंदिराचे कमिटी मेंबर असुन गेल्या १५ वर्षांपासुन शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शनासाठी दरवर्षी येत आहोत. असे सांगत शिर्डीला श्री साईबाबांचे दर्शन झाल्यामुळे मोठे समाधान मिळाले असेही त्यांनी यावेळी म्हटले.
दोन दिवसापूर्वीच जपान येथील सुमारे 18 साई भक्त शिर्डीला साई दर्शनासाठी आले होते. त्यांचाही सही संस्थांनने सत्कार केला.आज श्रीलंकेतील कोलंबो येथील हे साईभक्त आल्याचे पाहून येथील उपस्थित ग्रामस्थ ,साईभक्तांमध्येही त्यांच्याबद्दल एक कुतूहल वाटत होते. ते एकमेकांना हात घालवून अभिवादनही करीत होते.