दुधाला प्रत्यक्ष भाव वाढून मिळाल्याबद्दल ना. राधाकृष्ण विखे पा. यांचा बाभळेश्वर येथे दूध उत्पादकांकडून सत्कार!
लोहगाव ( सत्तेचा महासंग्राम न्युज)
राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा दिला असून दुधाला प्रति लिटर तीस रुपये व प्रति लिटरला पाच रुपये अनुदान घोषित करण्यात आले असून प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे व शासनाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अनेक दिवसापासून राज्यामध्ये दूध उत्पादकांची दुधाला भाव वाढवून देण्याची मागणी होती. ती मागणी राज्याचे महसूल मंत्री व पशुसंवर्धन मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पूर्ण केली आहे. त्यांनी राज्यातील दूध उत्पादकांना दुधाला प्रति लिटर 30 रुपये व प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे तीस रुपये प्रति लिटर दूधभाव सध्या दूध उत्पादकांना मिळू लागला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहे. प्रत्यक्ष दूध उत्पादकांना 30 रुपये प्रति लिटर दुधाला भाव दिला जात असल्यामुळे राज्याचे महसूल मंत्री तथा पशुसंवर्धन मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे बाभळेश्वर येथे दूध उत्पादकांच्या वतीने अभिनंदन करत जय जय काराच्या घोषणा देण्यात आल्या.व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा दूध उत्पादकांच्या वतीने दुधाला भाव वाढवून दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार मानण्यात आले.यावेळी डॉक्टर सुजय दादा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुहास बेंद्रे . पोलीस पाटील काकासाहेब म्हस्के . माजी उपसरपंच मीनाथ मस्के .तज्ञ संचालक तुकाराम बेंद्रे. रोकडे मामा फाउंडेशनचे अध्यक्ष शंकर रोकडे. ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब गोंडे. विजय बेंद्रे. अण्णासाहेब बेंद्रे. राजेंद्र बेंद्रे. सुनील बेंद्रे व दूध उत्पादक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.