Breaking
ब्रेकिंग

अंदरसुल येथील भव्य कीर्तन महोत्सव व विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज संगीतमय गाथा पारायण सोहळा उत्साहात संपन्न!! या सोहळ्याचे मार्गदर्शक ह भ प संजयजी महाराज जगताप यांचा अंदरसुल ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला सत्कार!!

0 9 1 3 8 1

 

शिर्डी (सत्तेचा महासंग्राम न्युज)

येवला तालुक्यातील श्री क्षेत्र अंदरसुल येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये वै. ह भ प ओंकारआप्पा गोपाळआप्पा सुराडे अंदरसुलकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त दि. वीस जुलै ते 23 जुलै 2024 या कालावधीत भव्य कीर्तन महोत्सव व विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज संगीतमय गाथा पारायण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

अंदरसुल येथे योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज व ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प गुरुवर्य महंत संजयजी महाराज जगताप

भऊरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य कीर्तन महोत्सव व विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज संगीतमय गाथा पारायण सोहळा वै. ह भ प ओंकारआप्पा गोपाळआप्पा सुराडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त आयोजित करण्यात आला होता.व या निमित्ताने दररोज पहाटे पाच वाजता काकडा आरती, सकाळी आठ ते दहा श्री संत निवृत्तीनाथ महाराज संगीतमय गाथा पारायण ,दुपारी तीन ते पाच या दरम्यान प्रवचन व सायंकाळी पाच ते सहा दरम्यान हरिपाठ तसेच रात्री आठ ते दहा या वेळेत कीर्तन सेवा उत्साहात होत होती . या सर्व कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती दिसून येत होती.

कार्यक्रमाच्या प्रथम दिवशी हभप समाधानजी महाराज पाटील, वंजारवाडीकर यांचे प्रवचन व रात्री आठ ते दहा या वेळेत ह भ प राहुलजी महाराज क्षीरसागर यांचे कीर्तन

त्याचप्रमाणे 21 जुलै रोजी गुरुवर्य हभप ज्ञानेश्वर महाराज बोंगीर, हिसवळ यांचे प्रवचन व रात्री गुरुवर्य ह भ प पोपट महाराज पाटील ,कासार खेडेकर यांचे कीर्तन त्याचप्रमाणे 22 जुलै रोजी प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प गुरुवर्य महंत संजयजी महाराज जगताप (भऊर, तालुका वैजापूर) यांचे दुपारी तीन ते पाच या वेळेत प्रवचन होवून रात्री आठ ते दहा या वेळेत गुरुवर्य महंत कैलासगिरीजी महाराज, सावखेडा, यांचे कीर्तन संपन्न झाले. तसेच या सोहळ्याच्या सांगता दिनी म्हणजे मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी सकाळी दहा ते बारा दरम्यान ह भ प गुरुवर्य महंत ज्ञानेश्वर महाराज मुडेकर माऊली, गंगाखेड. यांचे काल्याचे किर्तन होऊन त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक ह भ प संजयजी महाराज जगताप यांचा सुराडे परिवार व समस्त ग्रामस्थ अंदरसुल यांच्यावतीने शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.अंदरसुल व पंचक्रोशीतील भाविकांनी या सर्व कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकामी समस्त सुराडे परिवार व समस्त ग्रामस्थ अंदरसुल यांनी मोठे परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे