राहुरीत पतीने झोपेतच केली पत्नी आणि सासूची हत्या; पोलीस आरोपीच्या शोधा
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
प्रतिनिधी बाळकृष्ण भोसले
राहुरी : राहुरीमध्ये तालुक्यातील कात्रड येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी पतीने रात्री झोपेत असतानाच पत्नी आणि सासूच्या डोक्यात लोखंडी रॉडच्या सहाय्याने प्रहार करुन दोघांचा खून केला आहे. पत्नी आणि सासूला संपल्यानंतर आरोपी पतीने घरातून पळ काढला आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
पत्नी नूतन सागर साबळे (वय २३ वर्षे) तर सासू सुरेखा दिलीप दांगट (वय ४५ वर्षे) अशी मयतांची नावे आहेत. राहुरी तालुक्यातील कात्रड गावामध्ये मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी सागर सुरेश साबळे याने राहत्या घरात पत्नी आणि सासू या झोपेत असतानाच त्यांच्या डोक्यात लोखंडी पहारीने वार करून दोघांची हत्या केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपी पती फरार झालाय.
दरम्यान, दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आरोपीच्या भावाने पाहिल्यानंतर त्याने या घटनेची माहिती राहुरी पोलिसांना दिली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे , पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी पोहचले असून आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.
चौकट
दरम्यान आरोपी सागर साबळे याने अहमदनगर च्या एम आय डी सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे