आरोग्य विभागाची बोगस डॉक्टरवर कारवाई….
टाकळीभान( प्रतिनिधी )
श्रीरामपूर तालुक्यात काही व्यक्ती वैद्यकीय डिग्री नसताना रुग्णांवर उपचार करत असल्याची तक्रार तालुका आरोग्य विभागास 2 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. सदर तक्रार निपाणी फाटा व बेलापूर या ठिकाणाबाबत होती.
गटविकास अधिकारी श्री प्रवीण सिनारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा आ केंद्र माळवडगाव व प्रा आ केंद्र बेलापूर यांच्या आरोग्य पथकाने 6 ऑगस्ट सदर ठिकाणी जाऊन तक्रारीची शहानिशा केली. कथित बोगस डॉक्टरकडे असणारी वैद्यकीय उपकरणे,औषधे, प्रेस्क्रीप्शन पॅड व त्या ठिकाणी असणाऱ्या वैद्यकीय प्रमाणपत्राची तपासणी करून अहवाल तयार करण्यात आला. कथित बोगस डॉक्टरांना वैद्यकीय व्यवसायाच्या नियमानुसारच रुग्णांवर उपचार करावे अशी तंबी देण्यात आली होती. त्याबाबतची उलटतपासणी करण्यासाठी आरोग्य पथके पुन्हा 21 ऑगस्ट रोजी निपाणी फाटा व बेलापूर येथे गेली होती. त्याबाबतचा अहवाल तयार करून तालुका आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. सदर आरोग्य पथकामध्ये डॉ पी आर जाधव, डॉ उन्मेश लोंढे , डॉ दृष्टांत चौधरी, श्री जाधव तालुका सुपरवायझर, श्री प्रदीप बर्डे, श्री काकडे, श्री कोठुळे, श्री भाऊराव खडके , श्री गायकवाड, श्री अमोल गमे, श्री मयूर पठारे, श्री शेख, श्री रमेश मोरे यांचा समावेश होता. फौजदारी प्रक्रियेमध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री मेढे, पोलीस श्री सांगळे, पोलीस श्री टेकाळे, पोलीस श्री शेख, पोलीस श्री भडकवाड यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.