शिर्डीला पायी येत असलेल्या साई पालखीतील पदयात्रींचा अपघात! एक महिला ठार !दोन महिला जखमी!!
शिर्डी ( सत्तेचा महासंग्राम न्युज)
शिर्डीला दरवर्षीप्रमाणे यावर्षीहीश्रीरामनवमी उत्सवानिमित्त सिन्नर तालुक्यातील पाथरे येथून पायी येत असलेल्या साई पालखीतील साई पदयात्रांचा शिर्डीजवळील चांदेकसारे येथे भीषण अपघात झालाआहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झालाआहे.त्यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.या अपघातात दोन महिलाही गंभीर जखमी आहेत.या संदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,
शिर्डीला श्रीराम नवमी निमित्त श्री साई बाबांच्या दर्शनासाठी विविध भागातून पायी पालखी येत असतात.आज श्रीराम नवमी उत्सवाचा पहिला दिवस होता. या पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी अनेक साई पालखी शिर्डीला दाखल होत असतात. अशा साई पालख्या पैकीच गेल्या दहा-अकरा वर्षांपासून सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील साई पालखी व शेकडो साई पदयात्री सकाळी गावात आठ ते नऊ वाजे दरम्यान श्री साईंची मिरवणूक करून शिर्डी कडे पायी साई पालखी सह निघाले. श्री साई नामाचा जयजयकार करत पालखी झगडे फाटा येथून पुढे सावळी विहीर फाट्याकडे निघाली. या पालखीमध्ये अनेक महिलाही सामील झाल्या होत्या. या साई पदयात्री महिला झगडे फाटा ते सावळीविहीर फाटा या दरम्यान पायी चालत असताना हॉटेल साई मुकुंदा जवळ अचानक या पायी चालणाऱ्या महिला साई पदयात्रांच्या ग्रुपमध्ये एक मोटरसायकल घुसली व मोठा अपघात झाला. या अपघातात एका महिलाचा मृत्यू झाला असून, दोन महिला गंभीर जखमी आहेत. जखमींवर शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
श्रीरामनवमी निमित्तानं सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील श्रीराम मित्र मंडळाच्या वतीनं पाथरे ते शिर्डी अशी गेल्या 10 वर्षापासून पायी पालखी काढण्यात येते. यंदाच्या वर्षी या पालखीचे 11 वे वर्ष आहे. ही पालखी सिन्नर शिर्डी महामार्गावरील चांदेकसारे शिवारात आली असताना अचानक भरधाव वेगानं आलेली दुचाकी थेट या पालखीत शिरली व अपघात झाला आहे.
या भीषण अपघातात पालखीतील अनिता दवांगे (वय 45) या महिलेचा जोराची धडक बसल्यानं जागीच मृत्यू झालाय. तसंच कांता चिने व सरला दवांगे या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींवर शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेने पाथरे गावात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या अपघात संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.