पंढरीत श्री रोकडेश्वर हनुमान पायी दिंडी सोहळ्याला मा. खा.डॉ. सुजय विखे पा.यांची भेट! ह भ प संजयजी महाराज जगताप यांनी डॉ. खा. सुजय विखे यांचा दिंडीच्यावतीने केला सत्कार!!
राजकुमार गडकरी
शिर्डी(सत्तेचा महासंग्राम न्युज)
आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठू नामाचा जयघोष करत अनेक ठिकाणाहून हजारो पायी दिंड्या व लाखोंच्या संख्येने वारकरी आले होते. अनेक दिंड्यातील वारकरी काल्याच्या कीर्तनानंतर आपापल्या गावी माघारी फिरले आहेत तर काही गुरुपौर्णिमेनंतर आपल्या गावी येणार आहेत. गेले पंधरा-वीस दिवस पायी वारीत चालून हरिपाठ, भजन ,प्रवचन, कीर्तन व श्री पांडुरंगाचा जयघोष करत पंढरीत आलेल्या अनेक पायी दिंड्या व वारकरी आता आपापल्या घरी परतत आहेत. मात्र हा न भूतो न भविष्यती असा धार्मिक सोहळा प्रत्येकाच्या मनामनात कायमस्वरूपी स्मरणात राहणार आहे. वारीतील सर्व सुखद अनुभवाची आठवण आता प्रत्येकाला घरी आल्यानंतर येत आहे. म्हणूनच प्रत्येक जण हेचि व्हावी माझी आस! जन्मोजन्मी तुझा दास!! पंढरीचा वारकरी! वारी चुकू न दी हरी!! असे पांडुरंगाला मागणे घालत आहे.
आषाढी एकादशी निमित्त पंढरीत अनेक दिंड्या ,लाखोंच्या संख्येने वारकरी चंद्रभागा स्नानासाठी व श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी, मंदिराच्या कळस दर्शन व प्रदक्षिणासाठी पंढरीत आले होते.
त्यापैकी संभाजीनगर जिल्ह्यातील व इतर ठिकाणच्या अनेक दिंड्यांना व वारकऱ्यांना मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेटी दिल्या . प्रत्यक्षात पायी दिंडीतही सहभाग घेतला तसेच दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन वारकऱ्यांच्या समस्यांची विचारपूस केली व येणाऱ्या समस्या निवारण करण्यासाठी नक्कीच आपण राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना. अजित दादा पवार तसेच राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करू ,असे आश्वासन दिले.
मा. खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी अनेक पायी दिंडी सोहळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन पालखीचे दर्शन घेतले. वारकऱ्यांशी चर्चा केली. वैजापूर तालुक्यातील भऊर येथील श्री रोकडेश्वर हनुमान पालखी सोहळ्यालाही डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भेट दिली असता त्यांचा या दिंडीचे मार्गदर्शक व चालक ह भ प संजयजी महाराज जगताप यांनी त्यांचे स्वागत करत त्यांचा शाल श्रीफळ देऊन दिंडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मा. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिंडीतील सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देत वारकऱ्यांना पंढरीत निवास व इतर येणाऱ्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे यावेळी आश्वासन दिले.