Breaking
ब्रेकिंग

वाळूचा ढंपर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, सहा आरोपींना दोन वर्षाची शिक्षा वांबोरीतील घटना 

0 9 1 3 7 8

सत्तेचा महासंग्राम

ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया

राहुरी (सत्तेचा महासंग्राम वृत्तसेवा)

तालूक्यातील वांबोरी येथे ढंपरमधून वाळू तस्करी सुरु असताना पोलीस पथकाने ढंपर पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी पोलिस पथकाच्या गाडीवर ढंपर घालून मारण्याच्या प्रयत्न केला होता. या प्रकरणातील सहा आरोपींना जिल्हा न्यायालयाने दोन वर्षे शिक्षा सुनावली.
जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू वाहतुक करणारे वाहनावर कार्यवाही करणे करीता पथक नेमणेत आले होते. त्यानूसार अहमदनगर येथील स्थानिक गून्हे अन्वेषण विभाग पथक वांबोरीकडुन राहुरीकडे जात असताना आरोपी त्याचे ताब्यातील ढंम्पर नंबर एम एच १६ ए जी ९८८३ ही मध्ये ४ ब्रास चोरीची वाळु घेवुन भरधाव वेगाने जाताना दिसला. तेव्हा पथकाने ढंपर चालकाला थांबण्याचा इशारा दिला. मात्र आरोपीने पोलिस पथकाला जीवे मारण्याचे उददेशाने ढंपर भरधाव वेगाने चालवुन पोलिस पथक बसलेल्या जीपवर घालुन त्यांना जीवे ठार माण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर आरोपींनी स्वीप्ट व बोलेरो गाडी मधुन पाठीमागुन येवुन गैरकायदेची मंडळी जमा करुन पथकातील कर्मचारी यांना दमदाटी करत झटापट केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करून सरकारी वाहनाचे नुकसान केले होते.
या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार योगेश भास्कर घोडके यांच्या फिर्यादीवरून गून्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राहुरी पोलिस ठाण्याच्या वतीने तपास करुन भा.द.वि. कलम ३०७, ३५३, ३७९, ३३२, १४३, १४७, ४२७, ५०६, ३२३ नुसार आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्याची सुनावणी अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात न्यायाधीश एस. व्हि. सहारे यांच्या समोर झाली. या प्रकरणात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राहय धरुन सदर
आरोपींना३५३,३७९, १४३, १४७, ४२७, ५०६, ३२३ दोषी धरण्यात आले. आरोपींना भा.द.वि. कलम ३०७, ३३२, यातुन निदोर्ष मुक्तता करण्यात आली. आरोपी १) जगन्नाथ रघुनाथ बर्डे, वय २६, रा. हनुमान वाडी पिंपरी वळण, ता. राहुरी. २) किशोर कानिफनाथ वारुळे, वय २६, रा. वारुळवाडी, ता., जि. अहमदनगर. ३) सुधिर मुरलीधर दुसुंगे, वय ३०, रा. कापुरवाडी, ता.,जि. अहमदनगर. ४) सोनल सुभाष निकम, वय २५, रा. वडगाव गुप्ता, ता., जि. अहमदनगर, ५) युसुफ नजीर पठाण, वय ३०, रा. तवले नगर, ता., जि. अहमदनगर. ६) प्रमोद बाळासाहेब कराळे, वय २५, रा. वसंत टेकडी, पाईपलाईन रोड, ता. जि. अहमदनगर.
या सहा आरोपींना दोन वर्षे शिक्षा व प्रत्येकी तीन हजार रुपए दंड तसेच दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली. सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षाच्या वतीने ॲड. मंगेश व्ही. दिवाणे यांनी पाहीले. त्यांना पैरवी अधिकारी स. फौ. विलास साठे व पो. कॉ. योगेश वाघ यांनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे