योग साधनेतील उत्कृष्ट कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेले व सुमारे सव्वाशे वर्षापेक्षा अधिक वय असणारे पद्मश्री शिवानंद बाबा यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले श्री साईबाबांचे दर्शन!
शिर्डी ( राजकुमार गडकरी)
योग साधनेतील उत्कृष्ट कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेले व सुमारे 129 वर्षापेक्षाही अधिक वय असणारे
पद्मश्री शिवानंद बाबा यांनी नुकतीच शिर्डीला भेट देऊन श्री साई समाधी मंदिरात जाऊन दुपारची माध्यान्ह आरती केली. व श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला. यावेळी उप मुख्यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते. यावेळी पद्मश्री शिवानंद बाबांनी श्री साईबाबांचा जयजयकार केला.
योगासनातील उत्कृष्ठ कार्यासाठी पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेले हे शिवानंद बाबा आहेत.2019 साली त्यांचा बेंगळुरुमध्ये योग रत्न पुरस्कारानंही सन्मान करण्यात आलेला आहे. योग आणि संयमी दिनचर्या यांच्या मदतीनं त्यांनी शंभरीनंतरही स्वत:ला निरोगी ठेवलंय. ते सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित हाेणारे स्वामी शिवानंद हे सर्वाधिक वयाेवद्ध व्यक्ती आहेत. त्यांचा जन्म वाराणसीत ऑगस्ट १८९६ मध्ये झाल्याचे बोलले जाते. या वयातही दरराेज तासानतास याेगसाधना करण्याचे त्यांच्यात सामर्थ्य आहे. त्यांच्या निराेगी आणि दीर्घायुष्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे लक्ष वेधले गेले. साधे राहणीमान आणि साधा आहार, असे त्यांचे आयुष्य आहे. स्वामींनी आयुष्य समाजासाठी अर्पण केले. ते म्हणतात, विश्व हे माझे घर आहे. या जगातील सर्व लाेक माझे आई-वडील आहेत. त्यांच्यावर प्रेम करणे आणि सेवा करणे, हाच माझा धर्म आहे.निराेगी आयुष्यासाठी याेगसाधनेचाच मार्ग आहे, असा स्वामींचा ठाम विश्वास आहे. याेगामुळे मन, इच्छा आणि संवेदनांवर नियंत्रण मिळवता येते. इश्वर आणि ज्ञानाकडे जाण्याचा हा मार्ग आहे.योगसाधनास्वामींचे वय सुमारे १२९ वर्षे आहे. दरराेज याेगसाधना, तेलरहीत आणि उकडलेला आहार, मानवाप्रती नि:स्वार्थ सेवा हे त्यांच्या निराेगी आणि शिस्तप्रिय आयुष्याचे रहस्य आहे. गेल्या तीन दशकांपासून ते काशीच्या घाटांवर स्वत: याेग करतात आणि इतरांना शिकवतात. गेल्या ५० वर्षांपासून ते पुरी येथील कृष्ठराेग्यांची सेवा करीत आहेत. ते सध्या काशी वाराणसी येथे एका छोट्याशा रूममध्ये राहतात. त्यांची कोणतीही आश्रम शाळा किंवा मठ नाही. ते कोणतेही देणगी घेत नाही.ते ब्रह्मचारी आहेत. श्री साईंवर त्यांची खूप भक्ती आहे. असे त्यांच्या बरोबर आलेल्या त्यांच्या योगसाधक यांनी सांगितले. अशा पद्मश्री शिवानंद बाबा यांचे शिर्डीत आल्याचे समजताच उपस्थित ग्रामस्थ, साईभक्त यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.