महात्मा गांधी विद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न
प्रवरानगर( बाबासाहेब अत्रे)
महात्मा गांधी विद्यालय प्रवरानगर शैक्षणिक संकुलात शिक्षण सप्ताहाचा सहावा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या ध्येयधोरणानुसार इको क्लब फॉर मिशन लाईफ या अभियाना अंतर्गत plant for mother हा उपक्रम विद्यालयात मोठ्या उत्साहाने शिक्षक विद्यार्थी व माता पालक यांच्या उपस्थितीत मातांच्या व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.त्याचबरोबर विद्यार्थी व त्यांच्या आईचे नाव पाटीवर लिहून ही पाटी वृक्षा जवळ लावण्यात आली या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजेच आई विद्यार्थी आणि धरणीमाता यांच्यातील संबंध दृढ होणे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
त्याचप्रमाणे जे काही वृक्ष लावण्यात आले त्याची संगोपनाची जबाबदारी विद्यार्थी सदस्य व त्यांच्या मातांकडे सोपवण्यात आली वृक्षाचे संगोपन कसे करावे याविषयीचे मार्गदर्शन त्यांना करण्यात आले आणि वेळोवेळी इको क्लब तर्फे घेण्यात येणाऱ्या सभेसाठी उपस्थित राहण्याची विनंती सर्वांना करण्यात आली या सभेतून विविध टप्प्यात वृक्षांचे संगोपन करण्यासाठी चे मार्गदर्शन केले जाणार आहे या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री अंगद काकडे साहेब तसेच विद्यालयाचे प्रभारी पर्यवेक्षक श्री संजय ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. उपक्रम समन्वयक म्हणून श्रीमती शुभांगी भरसाखळ यांनी कामकाज केले व प्रास्ताविक कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती सोहनी मॅडम यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी सौ मेटे माया अनिल विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री निकाळे आर बी, श्री गावित आर .बी, श्री.गावित व्ही एस., श्री.सदगीर टी टी श्रीम. कुदळ पी डी, श्रीम.भालेराव पी आर, सौ.वर्पे आर एस, श्रीमती कासार के.एम.बाबासाहेब अत्रे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.