टाकळीभान हनुमान मंदिराच्या जागेत वाचनालय बांधकामास विरोध, युवकांचे अमरण उपोषण सुरु, चर्चा फिस्कटली ?
टाकळीभान प्रतिनिधी — विधान परीषदेचे पदविधर मतदार संघाचे आ. सत्यजित तांबे यांनी येथे अत्याधुनिक वाचनालय व अभ्यासिकेसाठी दिलेल्या ४५ लाखाच्या अनुदानातुन ईमारत बांधकामाच्या जागेबाबत एकमत होत नसल्याने हनुमान मंदिराच्या जागेबाबत हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध डावलुन ग्रामपंचात कडुन ग्रामसभेच्या ठरावाद्वारे वादातील जागेत बांधकाम करण्याचा प्रयत्न होत आसल्याने हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल २३ जानेवारी पासुन तलाठी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरु केले आहे. प्रमुख ग्रामस्थांनी उपोषणार्थिंची भेट घेवुन तोडगा काढण्याचा प्रयत्न केलाआसला तरी उपोषणार्थी मुद्यावर ठाम आसल्याने ही चर्चा फिस्कटली.
विधान परीषदेचे पदविधर मतदार संघाचे आ. सत्यजित तांबे यांनी निवड होताच टाकळीभान येथे आद्यावत वाचनालय व अभ्यासिकेसाठी सुमारे ४५ लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला होता. ही ईमारत हनुमान मंदिराशेजारी आसलेल्या शासकिय जागेत व्हावे यासाठी सुमारे पाच महीण्यापुर्वी सर्व पक्षिय कार्यकर्त्यांनी एकञ येवुन भुमिपुजन केले होते. माञ हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे या जागेतील बांधकामाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर नुकत्याच ३० आॕगष्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत या जागेवर बांधकाम करण्याचा ठराव करण्यात आला होता. माञ ग्रामसभेच्या ठरावा नंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. याबाबत महत्वाच्या कार्यकर्त्यांची व ग्रामपंचायत पदाधिकार्यांची सहमतीसाठी बैठकही घेण्यात आली होती. माञ त्या बैठकितही तोडगा निघाला नाही. त्यामुळे पोलिस संरक्षणात ठरलेल्या जागेवर बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पोलिस संरक्षणाची मागणी केलेली आहे. माञ या मुद्यावर प्रमुख कार्यकर्त्यांचे मत जाणुन घेण्यासाठी व निधी परत जावु नये म्हणुन काल सोमवारी पुन्हा एकदा बैठक ग्रामसचिवालयात बोलावण्यात आली होती. बैठकित संमिस्र मत आल्याने उपोषनार्थिंशी चर्चा करुन तोडगा काढण्याला सहमती देण्यात आली. त्यानुसार माजी सभापती नानासाहेब पवार, माजी सरपंच मंजाबापु थोरात, भाऊसाहेब मगर, , माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, प्रा. जयकर मगर यांनी उपोषणस्थळी जावुन उपोषणार्थी तरुणांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. माञ उपोषणार्थी हनुमान मंदिराच्या जागे ऐवजी ग्रामपंचायतीच्या ईतर जागेत आभ्यासिका बांधण्यात यावी या मताशी ठाम आसल्याने ही चर्चाही फिस्कटल्याने उपोषणार्थी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे उपोषण सुरुच आहे.
(चौकट )द्यावत वाचनालय व अभ्यासिकेच्या जागेचा तिढा गेल्या दहा महीण्यांपासुन सुरु आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी व हींदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते दोघेही इरेला पेटलेले आसल्याने तडजोडीची भुमिका घ्यायला कोणीही तयार नाही. वास्तविक सत्ताधार्यांची विकास कामे पुर्ण करण्यासाठी लवचिक भुमिका आसली पाहीजे व तक्रारदाराचे समाधान करुन विकास कामं होणे गरजेचे आहे. माञ हा प्रश्न अधिकच चिघळत चालला आहे. या अंतर्गत होत आसलेल्या संघर्षामुळे अनेक गरजु विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारा चांगल्या कामासाठी मिळालेला निधी परत जाणार कि काय ? हे येणारा काळच ठरवणार आहे.