शिर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप .
शिर्डी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
राजेंद्र दूनबळे
शिर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.. सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पूजा आर्ची व पूजापाठ करुन शिर्डीतील आदर्श विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा करून विठ्ठल रुक्मिणी फोटोची ट्रॅक्टर ला सजावट करून शिर्डी शहरातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आलीय..
ही मिरवणूक विठ्ठल मंदिरात आल्यानंतर शाळेचे आधारस्तंभ डॉक्टर प्रबोध जोशी यांनी विठ्ठल नामाचा जय घोष करत विद्यार्थ्यांसमवेत भजन कीर्तन करून विद्यार्थ्यांना व भाविकांना मंत्रमुग्ध केले त्याचप्रमाणे शाळेतील कर्मचारी वृद्ध यांनी यांनी भजन किर्तन सादर केले
यावेळी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषा करून आलेले शाळेतील विद्यार्थी कलाकार व इतर शाळेतील मुलांनी आपल्या कला सादर केल्याय.. कार्यक्रमानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना व भाविकांना आदर्श शाळा तसेच विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट तसेच स्वर्गीय भाऊसाहेब सखाराम पाटील ट्रस्ट , साई रुद्रा फाउंडेशन शिर्डी साई द्वारका सिक्युरिटी च्या वतीने महाप्रसाद केळी व खिचडीचे वाटप करण्यात आले…
वै लक्ष्मण महाराज वाकचौरे यांच्या प्रेरणेने ट्रस्टचे प्रेरणास्थान वै,भास्करावसखाराम गोंदकर यांच्या पत्नी गं, भा, श्रीमती सुमनबाई भास्कर गोंदकर , ट्रस्टचे अध्यक्ष सुनील गोंदकर सर्व विश्वस्त मंडळ , राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर, मा उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर, किशोर गोंदकर , दीपक गोंदकर , सुशांत अवताडे , आशिष गोंदकर ,अभिजीत गोंदकर , अमोल सुपेकर , रुद्रा फाउंडेशन शिर्डी शहर, साई द्वारका सिक्युरिटी शिर्डी परिसरातील विठ्ठल भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते..