मोटरसायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद! 22 लाख 82 हजार रुपये किमंतीच्या तीस मोटरसायकल केल्या हस्तगत!
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
शिर्डी (सत्तेचा महासंग्राम वृत्तसेवा)
शिर्डी येथून एका महिला साथीदाराच्या मदतीने मोटरसायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी नगर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली असून या टोळीकडून २२ लाख ८२ हजार रुपये किंमतीच्या ३० गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,
नगर जिल्ह्यामध्ये मोटारसायकल चोरी करणारे चोरट्यांनी धुमाकुळ घातलेला होता. शिर्डीतूनही अनेक मोटर सायकल चोरी गेल्या होत्या. सदर मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधिक्षक, नगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना आदेश दिले होते.
या आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, सफौ/बाळासाहेब मुळीक, भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/अतुल लोटके, पोना/रविंद्र कर्डीले, पोना/गणेश भिंगारदे, पोना/संदीप चव्हाण, पोना/संतोष खैरे, फुरकान शेख, विजय ठोंबरे, पोकॉ/बाळासाहेब गुंजाळ, रणजित जाधव, चालक पोहेकॉ/उमाकांत गावडे यांचे ” विशेष पोलीस पथक ” स्थापन करुन अहमदनगर जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्ह्याची माहिती घेवुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
पोलीस पथक शिर्डी परिसरामधील चोरीस गेलेल्या मोटारसायकल ठिकाणाची पाहणी करुन तसेच पोलीस स्टेशन अभिलेखाची खात्री करता शिर्डी परिसरामधुन विशेषत: होंडा कंपनीच्या जास्त गाड्या चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्या दृष्टीने अशाप्रकारे गुन्हे करणारे अहमदनगर तसेच आजुबाजुचच्या जिल्ह्यामधील मोटारसायकल चोरीमधील आरोपीची माहिती काढत असतांना पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, 1) अन्वर मन्सुर शेख रा. पानमळा, कोपरगांव हा चोरीची मोटारसायकल घेवुन शिर्डी ते कोपरगांव जाणारे रोडवर सावळीविहीर फाटा या ठिकाणी थांबलेला आहे .अशी गुप्त खबर मिळाल्याने या विशेषपोलीस पथकाने सावळीविहीर परिसरामध्ये सापळा लावुन सदर इसमास ताब्यात घेतले.
त्याचेकडे या चोरीच्या मोटारसायकल बाबत विचारपुस करता त्याने तसेच त्याचे इतर साथीदार बबन धोंडीराम मोगरे वय 48 वर्षे, रा. रावळगांव, ता. मालेगांव, शाहीस्ता मन्वरअली सय्यद, रा. कोपरगांव, ता. कोपरगांव (फरार), माया दिनेश चौधरी रा. कालिकानगर, शिर्डी, ता. राहाता (फरार), अंकुश भावसिंग चव्हाण वय – 42 वर्षे, रा. रिठ्ठी मोहर्डा, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर यांचेसह अहमदनगर, नाशिक, मालेगांव, परभणी या जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन मोटारसायकली चोरी केलेल्या असल्याची कबुली देवुन विविध ठिकाणावरुन 22,82,000/- रुपये किमंतीच्या एकुण 30 मोटारसायकल काढुन दिलेल्या आहेत.
ताब्यात घेण्यात आलेले इसम नामे 1) अन्वर मन्सुर शेख रा. पानमळा, कोपरगांव, जि. अहमदनगर, 2) बबन धोंडीराम मोगरे वय 48 वर्षे, रा. रावळगांव, ता. मालेगांव, जि. नाशिक, 3) अंकुश भावसिंग चव्हाण वय – 42 वर्षे, रा. रिठ्ठी मोहर्डा, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर यांना शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 498/2022 या गुन्ह्याचे तपासकामी हजर करण्यात आले असुन पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे करीत आहे.
आरोपी नामे अन्वर मन्सुर शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द यापुर्वी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यामध्ये जबरी चोरी, चोरी असे एकुण 11 गुन्हे दाखल आहेत .
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, मा. श्री. संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.