Breaking
ब्रेकिंग

टाकळी भान ट्रक चालकाचा पश्चिम बंगाल मध्ये मारहाणीत मृत्यू

मारहाण करणारास कडक शासन व्हावे टाकळीभान परिसरातील नागरीकांची मागणी

0 9 1 3 8 2

 

 

टाकळीभान(प्रतिनिधी)— श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील ट्रक चालकाचा पश्चिम बंगालच्या खडकपुर येथे अपघाताच्या कारणावरुन जमावाकडून झालेल्या जबर मारहाणीत मुत्यु झाला आहे. तीन दिवसानंतर मृतदेह टाकळीभान येथे आणल्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावणात अंत्यसंस्कार पार पडले. येथील गरीब कुटुंबातील शाम शंकर गणकवार ( वय२९ वर्षे ) हा टाकळीभान येथून ट्रक क्रमांक एम.एच १७ – बी.झेड. ४५८२ मध्ये कांदा भरुन पश्चिम बंगाल येथील खडकपूर येथे जात असताना त्याच्या कडून अपघात झाला होता . मात्र तो घटना स्थळावरुन गाडी सोडुन पळून न जाता अपघातातील जखमी झालेल्यांना मानवतेच्या भावनेने मदत करीत होता. याचवेळी अपघात स्थळी जमा झालेल्या जमावा कडून त्याला जबर मारहाण झाली. जमावाच्या जबरी मारामुळे त्याचा जागेवरच मुत्यु झाला. त्याला वाचवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही जमावाकडुन मारहाण झाल्याने सुमारे दहा पोलिस कर्मचारीही जखमी झाले . गाडीला ठोकायचे आणि पळून जायचे असे प्रकार नेहमी होत असतात. पण आता हे प्रकार चालणार नाहीत. हिट अँड रन केसमध्ये आता कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केलं आहे. त्यात अपघात करून फरार होणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. अपघात घडल्यानंतर वाहनचालकानेच तात्काळ पोलिसांना त्याची माहिती देणं बंधनकारक आहे. पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेल्यास कमीत कमी १० वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.  मात्र नियमाचे पालन करतांनेच टाकळीभान येथील शाम याला जीव गमवावा लागला. त्याच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे