गॅस सिलेंडरच्या स्फोटात जखमी झालेल्या रणधीर परिवाराला ग्रामपंचायत सावळिविहीरच्या वतीने तातडीने मदत..
शिर्डी.(सत्तेचा महासंग्राम न्युज)
राजेंद्र दुनबळे
सावळीविहीर येथील सोपान सयाजी रणधीर यांच्या राहात्या घरात गेल्या दोन दिवसांपूर्वी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने त्यांची सुनबाई सपना सिद्धार्थ रणधीर.वय 25 वर्ष..व नातू गौरव जखम झाले आहे.दोन दिवसांपूर्वी
सायंकाळी सहा ते सात वाजे दरम्यान सपना रणधीर चहा करण्यासाठी घरामध्ये आले असता गॅस पेटवताक्षणी गॅस सिलेंडरचा भडका झाला या वेळी सपना व त्यांची मुलं भाजल्याने त्यांना ताबडतोब लोणी येथील प्रवारा हॉस्पिटलमध्ये उपचारा साठी दाखल करण्यात आले.
सदर घटना ही गॅस सिलेंडर लीक झाल्यामुळे झाली असल्याचे प्रथमदर्शनी अशी गावात चर्चा आहे
या स्फोटामध्ये झालेल्या दुर्घटनेत घरातील सर्व वस्तू जळून खाक झाले आहे. या परिवारासाठी तातडीची मदत म्हणून सावळीविहीर ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपजीविकेसाठी लागणाऱ्या वस्तू भाजीपाला अन्न शिजवण्यासाठी लागणारे भांडे. किराणा सामान.कपडे. चटई .रग .कुकर. वस्तू ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना देण्यात आल्या याप्रसंगी सावलीविहीर ग्रामपंचायतिचे सरपंच ओमेश जपे. ग्राम विस्तार अधिकारी कारले भाऊसाहेब. माजी सरपंच सोपानराव पवार.
राहाता कृषी बाजार उत्पन्न समितीचे संचालक शांताराम जपे.गणेश कापसे. गणेश आगलावे. पोलीस पाटील संगीता ताई वाघमारे. सुरेश वाघमारे.
कैलास पळसे. ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.