कोपरगाव येथील गिरीश पगारे यांच्या राहत्या इमारतीचस आगीने मोठे नुकसान! सुदैवाने जीवित हानी टळली!
कोपरगाव ( प्रतिनिधी) कोपरगाव येथील गांधी चौक परिसरातील कापड बाजारामध्ये राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरुषोत्तम पगारे सर यांचे लहान बंधू गिरीष पगारे यांच्या तळमजल्याच्या हॉल ला विजेच्या शॉर्टसर्किटने आग लागून मोठा पेट घेतला. मात्र अभिजीत पगारे व अनेकांनी धाव घेऊन ही आग विझवली. मात्र या आगीमध्ये घरातील सामानांचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने या इमारतीत असणारे पुरुषोत्तम पगारे सर यांच्या घरातील १२ जण सुखरूप बचावले. व कुणीही सुदैवाने फारसे जखमी झाले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव शहरात गांधी चौका जवळ कापड बाजारामध्ये राष्ट्रीय आदर्श शिक्षक प्राप्त पुरुषोत्तम पगारे सर अनेक वर्षापासून
स्व:मालकीच्या इमारतीत राहतात. या इमारतीच्या तळमजल्यावर गिरीष पगारे यांच्या हॉल मध्ये रविवार दिनांक एक सप्टेंबर २०२४ रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे अचानक पेट घेतला व क्षणात सुमारे दहा फूट आगीचा लोळ दिसू लागला. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असणारे पुरुषोत्तम पगारे सर यांचे पुतणे अभिजीत अरुण पगारे यांना वरती काळ्या धुराचे लोळ दिसल्यामुळे ते ताबडतोब खाली आले व त्यांनी पकडीने तात्काळ वीज पुरवठा खंडित करून तेथील कुपनलिका चालू करून गिरीष पगारे व सर्व पगारे बंधू तसेच इतरांच्या सहकार्याने पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत धुराचे काळे लोळ सर्व इमारतीत व आसपासच्या दुकानातही पसरले. खालच्या तळमजल्यावरील खाली व वरच्या मजल्यावर वरती अशी परिस्थिती घरातील कुटुंबांची झाली होती. धुरामुळे खाली उतरता येत नव्हते. तिसऱ्या मजल्यावर लहान-मोठे असे १० जण अडकले होते. धुरामुळे काही वेळातच सर्वांना श्वासोश्वासालाही त्रास होऊ लागला. मात्र भारत पगारे यांनी तात्काळ निर्णय घेऊन व प्रसंगावधान राखून वरच्या मजल्याच्या कडेच्या सात ते आठ फुट उंचीच्या भिंतीवरून सर्वांना शेजारील इमारतीच्या पत्र्यावर उड्या मारून उतरवले. व सर्वांचे जीव वाचवले. सर्वजण या कठीण परिस्थितीतून सुखरूप खाली आल्यानंतर सर्वांनी निश्वास सोडला. धुराचे लोळ सर्वत्रच दिसत असल्यामुळे येथे मोठी गर्दी झाली. सुमारे ४०० ते ५०० स्नेही काही क्षणात जमा झाले. भयाने आरडाओरड, गोंधळ, त्यामुळे एकच धावपळ उडाली. इतरांना काय झाले हे समजण्याच्या आताच अनेक हितचिंतकानी संपर्क करून अग्निशामक, पोलीस व वीज बोर्डाचे वायरमन यांना घटनास्थळी पाचरण केले. उपस्थित शेजारी व नागरिकांनी पगारे सर यांच्या कुटुंबांना धावपळ करून मोठी मदत केली. व धीर दिला. सहकार्य केले. व सुमारे १ तासाने आग ही आटोक्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. कुणी फार जखमीही झाले नाही. मात्र सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांच्या घरातील जीवना जीवनाश्यक वस्तू व अनेक सामानाचे जळून नुकसान झाले असून कामगार तलाठी व वीज बोर्डाचे अधिकारी यांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान या आगीच्या भयानक घटनेतून आमच्या घरातील सर्व सदस्य सुखरूप बचावलो. कोणीही फारसे जखमी झाले नाही. काळ आला होता. पण वेळ आली नव्हती. अशी प्रतिक्रिया पुरुषोत्तम पगारे यांनी व्यक्त केली. इमारतीत तीन खोल्यांमध्ये तीन गॅस सिलेंडर होते तेही सुरक्षित राहिले. त्यातील १ जरी सिलेंडर फुटला असता तर खूप मोठा अनर्थ झाला असता. शेजारी, दुकानदार, उपस्थित नागरिकांनी मोठी मदत केली तसेच आमचे पुतणे अभिजीत अरुण पगारे यांनीही मोठी रिस्क घेत वीज पुरवठा खंडित करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच घटनास्थळी अग्निशामक, पोलीस, वीज वितरणचे अधिकारी, महसूलचे अधिकारी व सर्व शासकीय यंत्रणा तात्काळ धावून आल्या. या सर्वांचे पुरुषोत्तम पगारे सर यांनी धन्यवाद मानले आहेत. दरम्यान गिरीष पगारे यांचे या आगीच्या घटनेमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना तातडीने शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी पगारे सरांचे नातेवाईक व मित्रमंडळींकडून होत आहे.