मराठा समाजाचा सरकारने अंत पाहू नये — डॉ. कृषिराज टकले पाटील
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
श्रीरामपुर(डिजिटल मिडिया वृत्तसेवा)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सराटि येथे उपोषण सुरू करून आठ दिवस झाले मात्र अजूनही सरकारने जरांगे यांच्या मागण्या वर कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण जाहीर करून न्याय द्यावा मराठा समाजाचा अंत पाहू नये असे आवाहन स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषिराज टकले पाटील यांनी केले
मनोज जरांगे यांच्या उपोषणात मराठा आंदोलकांवर प्रसासनाने लाठीचार्ज केला त्याचा निषेधही स्वाभिमानी मराठा महासंघ करत आहे
मराठा समाजाचे 57 ते 58 मोर्चे निघाले समाजाला न्याय मिळाला नाही 42 तरुणांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले तरी समाजाला न्याय मिळाला नाही मराठा समाजातील शेतकरी रोज आत्महत्या करतो तरी मराठा आमदार खासदार मंत्री गप्प आहेत मराठा समाजाच्या प्रश्नी मराठा पुढाऱ्यांना लक्ष द्यायला वेळ नसेल तर 2024 च्या निवडणुकीत ताकद दाखवून देवू असे स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषिराज टकले पाटील यांनी केले
स्वाभिमानी मराठा महासंघाचे शिष्टमंडळाने उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची सराटी येथे जाऊन उपोषण स्थळी भेट घेतली आणि स्वाभिमानी मराठा महासंघाचे पाठिंब्याचे पत्र मनोज जरांगे पाटील यांना दिले त्या प्रसंगी डॉ कृषिराज टकले पाटील बोलत होते
या शिष्टमंडळात स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषिराज टकले पाटील, शेतकरी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुभाष गागरे, बीड जिल्हा अध्यक्ष अमोल राजे भोसले,शंकर ढोक,भुसे पाटील उपस्थित होते