ओम साई हॉटेल चालकाचा खुन
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
नेवासा तालुक्यातील लोखंडी फॉल नजीक ओम साई हॉटेल चालकाचा खून
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, श्रीरामपूर ते नेवासा रस्त्यावर बाळासाहेब सखाहरी तूवर( वय वर्ष 60) यांचे ओम साई या नावाने हॉटेल लोखंडी नजीक कारवाडी परिसरात असून या हॉटेल व्यवसायातून तूवर हे आपला उदरनिर्वाह करीत होते. मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी दिवसभर हॉटेलचा व्यवसाय करून रात्री हॉटेल बंद करून झोपले होते. मात्र बुधवार दिनांक 13 मार्च सकाळी आठ वाजता हॉटेल का उघडले नाही अ ज्ञात व्यक्तीने दर दरवाजातून डोकावून पाहिले असता बाळासाहेब तुवर यांच्या डोक्याला मार लागून डोक्याभोवती व कानात रक्त दिसून आले. अज्ञात व्यक्तीने हे पाहून त्याने नेवासा तालुका पोलीस स्टेशनला कळवून याबाबत माहिती दिली. नेवासा तालुका पोलीस स्टेशनचे पीआय धनंजय जाधव यांच्यासह त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पीआय धनंजय जाधव यांनी घटनेची बाब गंभीर असून याचा उलगडा होण्यासाठी श्वान पथक व फिंगरप्रिंट पथक यांना पाचरण केले.सदर घटनेचा पंचनामा करून तुवर यांचा मृत्यू देह शेव विच्छाधनासाठी पाठवला आहे घटना नेमकी कशामुळे घडली हे मात्र कळू शकले नाही याचा पुढील तपास पीआय धनंजय जाधव करीत आहे