टाकळीभान येथील हनुमान मंदिराच्या जागेवरून पुन्हा ग्रामपंचायत व सकल हिंदू समाजामध्ये संघर्ष पेटण्याचे चिन्ह दिसत आहे ?
टाकळीभान( प्रतिनिधी)
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील हनुमान मंदिरच्या जागेवरून पुन्हा ग्रामपंचायत व सकल हिंदू समाजामध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसत आहे,
टाकळीभान-गावात मागील काही दिवसापूर्वी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे’ आमदार सत्यजित तांबे यांनी अभ्यासिका उभारणीसाठी निधी मंजूर केला होता. त्या अभ्यासिकाच्या उभारणीसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने कोणालाही विश्वासात न घेता परस्पर टाकळीभान येथील हनुमान मंदिर येथील जागेची निवड केली आणि त्याचे भूमिपूजनही केले.परंतु मंदिराची जागा ही अभ्यासिकासाठी न घेता इतर ठिकाणी अभ्यासिका उभारावी अशी विनंती टाकळीभान येथील सकल हिंदू समाजाने केली. त्यासाठी ग्रामस्थांचे सुमारे चारशे सह्यांचे निवेदन देऊनही केवळ काही ग्रामपंचायत सदस्यांच्या अट्टहासापोटी आता परत त्याच जागेची निवड अभ्यासिकेसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने केली आहे.त्यावरून सकल हिंदू समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा असूनही केवळ काही ग्रामपंचायत सदस्याच्या अट्टहासापोटी ग्रामपंचायत हा निर्णय घेत आहे गावातील बहुसंख्य हिंदू समाजाला तो निर्णय अमान्य आहे. त्यामुळे पुन्हा त्या जागेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असून त्याबाबत गावात चर्चा सुरू आहे.
सदर प्रकरणावरून काही ग्रामपंचायत सदस्य सत्तेचा फायदा घेऊन ठराविक कार्यकर्त्यांना अडवून धमक्या देत आहे.असाही आरोप काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला आहे.