सुसंस्कृत लोकप्रतिनिधी हेच लोकशाहीचे आदर्श रक्षक ……डॉक्टर बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूर (सत्तेचा महासंग्राम न्युज)
भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीयाला प्रिय असून लोकशाहीचे बळकटीकरण, राष्ट्र व समाजसेवेचे साधन होण्यासाठी सुसंस्कृत लोकप्रतिनिधी हेच आदर्श असून विद्यानिकेतनमध्ये अशा विद्यार्थी प्रतिनिधींची जडणघडण होत आहे, असे विचार साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील अड, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचालित विद्यानिकेतन इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक संपन्न होऊन विद्यार्थी प्रतिनिधी पीनप्रदान व शपथविधी सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ . शंकरराव गागरे होते. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे चेअरमन प्राचार्य टी.ई. शेळके, प्रा. शिवाजीराव बारगळ, प्राचार्य विनोद रोहमारे, उपप्राचार्या भारती कुदळे, क्रीडासंचालक अजय आव्हाड, समन्वयक मंगेश साळुंखे, सुनंदा थोरात आदी उपस्थित होते. प्रारंभी अड, रावसाहेब शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितीत मान्यवरांनी केले. प्राचार्य विनोद रोहमारे यांनी स्वागत करून पाहुण्यांचा सत्कार केला. क्रीडासंचालक अजय आव्हाड यांनी प्रास्ताविक केले. सुनंदा थोरात यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपप्राचार्य भारती कुदळे व सुनंदा थोरात यांचा डॉ बाबुराव उपाध्ये लिखित पुस्तके देऊन चेअरमन प्राचार्य शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. विद्यार्थी प्रतिनिधींना उपस्थित मान्यवरांनी पीनप्रदान करण्यात येऊन सत्कार केले. शपथविधी संपन्न झाला. प्राचार्य टी. ई. शेळके आपल्या भाषणात म्हणाले, सुदृढ लोकशाही निर्माण करण्याचा हा उपक्रम स्तुत्य असून असे उपक्रम शालेय स्तरावर झाले तर चांगले लोकप्रतिनिधी निर्माण होतील. विद्यानिकेतन ही केवळ शाळा नाही तर राष्ट्र उभारणीचे केंद्र आहे, असे सांगितले. डॉ. उपाध्ये हे आपल्या मनोगतात पुढे म्हणाले, स्व. अड, रावसाहेब शिंदे यांचे सुसंपन्न आदर्श व्यक्तिमत्त्व , चेअरमन प्राचार्य टी.ई. शेळके यांचे सेवाभावी मार्गदर्शन, डॉ. राजीव शिंदे, डॉ, प्रेरणा शिंदे आणि प्राचार्य विनोद रोहमारे, उपप्राचार्या भारती कुदळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवकांचे योगदान विद्यानिकेतनच्या प्रगतीत मोठे आहे, असे सांगून प्रतिष्ठानच्या सुंदर परिसराचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, शालेय स्तरावरच देशभक्ती आणि समाजसेवेचे आदर्श निर्माण केले जात आहे, हे भूषणावह असल्याचे सांगून उपकमाचे कौतुक केले. प्रा. शिवाजीराव बारगळ म्हणाले, निवडणूक लढविण्याचा अनुभव हा विद्यार्थी दशेत गरजेचे आहे, असे सांगून विद्यानिकेतन ही आदर्श शाळा असल्याचे सांगितले. विद्यार्थी प्रतिनिधीतर्फे संजीवनी गाडेकर, साईराज थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन स्वरा पाटील व समीक्षा लांडे यांनी केले तर हिंदवी रोडे हिने आभार मानले.