Breaking
ब्रेकिंग

टाकळीभान येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्या बदलीची विद्यमान सदस्यांची मागणी

0 9 1 3 8 2

 

सत्तेचा महासंग्राम

ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया

 

 

दिलीप लोखंडे

टाकळीभान प्रतिनिधी(डिजिटल मिडिया वृत्तसेवा)

–टाकळीभान येथील सरपंच उपसरपंच बदलीची मागणी विद्यमान सदस्य सुनील बोडखे, कविता रणनवरे आणि छाया रणनवरे यांनी केली,
टाकळीभान ग्रामपंचायतची निवडणूक होऊन अडीच वर्षे उलटून गेले आहे. त्यावेळी विरोधकांच्या विरोधात १६-१ अशा फरकाने निवडणूक लोकसेवा महाविकास आघाडीने निवडणूक जिंकून इतिहास घडविला होता. परंतु मनमानी कारभार सुरू असल्याने उपसरपंच यांच्या विरोधात आवाज उठू लागला. त्याकरणाने सत्ताधारी गटात फूट पडली. सत्ताधारी मंडळात फूट पडण्यापूर्वी काही स्वयंघोषित नेत्यांनी २०-२०-२० महिन्याचा फॉर्मुला अनुसूचित जातीच्या सरपंच पदासाठी ठेवला आणि त्याबरोबर उपसरपंच पद ही स्वतः सोडण्याची भाषा केली होती. उपसरपंच पदाचा कालावधी १-१ वर्ष ठरवून प्रत्येकाला संधी देण्याची भाषा केली होती,
परंतु आज अखेर या स्वयंघोषित पुढाऱ्याने त्याने केलेल्या भाषेलाच तिलांजली देऊन राजीनामा न देता सत्तेच्या लोभापाई बाकी लोकांना दोषी धरत आहे.
आज सरपंच उपसरपंच पदाची निवड होऊन ३१ महीने उलटून गेले आहेत. तरीदेखील सरपंच आणि उपसरपंच राजीनामा देत नाही याची आम्हाला खंत आहे. तरी स्वतः उपसरपंच कान्हा खंडागळे यांच्या म्हणण्याप्रमाणे सरपंच अर्चना रणनवरे आणि उपसरपंच कान्हा खंडागळे यांचा कालावधी संपला असून त्यांनी उर्वरित सदस्यांना संधी द्यावी अशी सर्व ग्रामपंचायत सदस्यांची मागणी आहे.
तसेच उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी ग्रामपंचायत सभागृहात पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देण्याचे नाटक केले होते परंतु आजतागायत त्यांनी राजीनामा दिलेला नाही यावरून कान्हा खंडागळे हे शब्दाचे किती पक्के आहेत याची प्रचिती सर्वांना याआधीच आलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास उरलेला नाही.
तरी सर्व सदस्यांनी उपसरपंच आणि सरपंच यांनी राजीनामा देऊन नवीन सरपंच व उपसरपंच यांची निवड करून सर्वांना संधी द्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी लवकरच श्रेष्ठींकडे भेट घेऊन निवेदन देणार आहे असे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सुनील बोडखे, कविता रणनवरे आणि छाया रणनवरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले आहे.

*चौकट :- सध्या तरी विद्यमान उपसरपंचाची अवस्था ना घर का, ना घाट का” अशी झालेली असून त्यामुळे उपसरपंच आपल्या माजी सहकाऱ्यांवर बेताल आरोप वर्तमानपत्रातून करत आहे असे सुनील बोडखे म्हणाले.*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे