आश्वी येथे कला, वाणिज्य, विज्ञान ,संगणक शास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा!
शिर्डी (प्रतिनिधी)
कला वाणिज्य विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालय आश्वी येथे राष्ट्रीय ग्रंथपाल दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस आर रंगनाथन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो .याचे औचित्य साधून कला वाणिज्य विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालय आश्वी खुर्द महाविद्यालय ग्रंथालय विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाने नुकताच साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. महेश खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य देविदास दाभाडे , कोल्हार महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.प्रतिभा कानवडे यांच्या हस्ते डॉ.एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी
प्रा.एम .जी औताडे यांनी भारतात ग्रंथालय चळवळ रुजविण्याकरता डॉ. एस आर रंगनाथन यांच बहुमूल्य असे योगदान याबरोबर डॉ. एस रंगनाथन यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली कार्यक्रमास रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.भुमकर मराठी विभाग प्रमुख डॉ.घोलप वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.घोलप आदींसह प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, उपस्थित होते.