चिंचोडी पाटील येथे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने काळी फित लावून धरणे आंदोलन करण्यात आले.
आहिल्यानगर (सत्तेचा महासंग्राम न्युज)
चिचोंडी पाटील येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ काळी फीत लावून धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे,शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे,शिवसेना नेते डॉ.ययाती फिसके,मा.सरपंच डॉ.मारुती ससे,मा.सरपंच मच्छिंद्र खडके,शहाजी गोरे,हरिभाऊ कोकाटे सर आदींनी आपल्या भाषणातून तीव्र निषेध व्यक्त केला.
आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने या घटनेमध्ये राजकारण न आणता माता भगिनींच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली.
यावेळी चेअरमन महादेव खडके, व्हा.चेअरमन अर्जुन वाडेकर, उपसरपंच विश्वसागर कोकाटे,मा. सरपंच दिलीप पवार,मा.चेअरमन राजेंद्र कोकाटे,मा.व्हा.चेअरमन काशिनाथ बेल्हेकर,राजेंद्र पवार,सेवा सोसायटी संचालक भाऊसाहेब वाडेकर,पै.राजूभाऊ कोकाटे,शिवसेनेचे अजय कांकरिया,महादेव खडके,ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे,संदीप काळे,ज्ञानेश्वर ठोंबरे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक कांबळे,जगदंबा माता ट्रस्टचे संजय पवार,रमेश कुलथे,नानासाहेब कोकाटे,लोकमान्य पतसंस्थेचे अरुण दवणे,गणेश इंगळे,गणेश वाडेकर,राजेंद्र कोकाटे,ज्येष्ठ नागरिक संघाचे कल्याण पाटील जगताप,मोहन तनपुरे,खंडेराव पवार,दिनकर भोस गुरुजी,गंगाधर दरेकर,सुदाम करांडे गुरुजी,गणपत पवार,बाबासाहेब पवार सर,अशोकदादा कोकाटे,छबुराव कोकाटे,शेषराव ठोंबरे,प्रकाश खडके,रामभाऊ जाधव,शंकर जगताप,संभाजी खडके,अशोक फसले,कैलास कानडे,मच्छिंद्र पवार,रंगनाथ शेंदुरकर,शिवाजी बेल्हेकर,जाणू तनपुरे,कुद्दुस सय्यद,कमलेश मेहेत्रे,नेवासराव कोकाटे,गोरख खडके,कल्याण कोकाटे,शिवाजी कोकाटे,नवनाथ कोकाटे,चिंतामण कोकाटे,शिवाजी भद्रे यांसह चिचोंडी पाटील येथील संवेदनशील नागरिक महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.